मेणबत्तीचा वापर करून आपल्या वास्तूत आणा सकारात्मक ऊर्जा !

आपला बराच वेळ हा घरामध्ये, ऑफिस किंवा घरातील इतर ठिकाणी आपण घालवत असतो.
Vastu tips, Vastu Tips For Candles
Vastu tips, Vastu Tips For Candlesब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उत्तर, दक्षिण, पूर्व व पश्चिम या वास्तूशास्त्रातील महत्त्वाच्या दिशा आहेत. आपल्या वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो. आपला बराच वेळ हा घरामध्ये, ऑफिस किंवा घरातील इतर ठिकाणी आपण घालवत असतो. वास्तुशास्त्रानुसार जसे दिव्याचे महत्त्व आहे तसेच मेणबत्तीचे देखील आहे.

हे देखील पहा -

मेणबत्तीचा वापर आपण सहसा लाईट गेल्यानंतर किंवा कँडल्स लाईट डिनरसाठी करतो. पण या मेणबत्तीचा वापर आपल्या वास्तूसाठी किती महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, त्याची दिशा कोणती असायला हवी. तसेच मेणबत्तीचा आकार कसा असायला हवा. फेंगशुईत सांगितलेल्या पध्दतीने आपण घरात मेणबत्तीद्वारे नवी सकारत्मक ऊर्जा आणू शकतो.

मेणबत्तीचा वापर आपण कसा करायला हवा हे जाणून घेऊया

१. घरात (Home) आपण कँडल्स पेटवत असू तर त्या एका लयबध्द शृंखलेत पेटवायला हव्या. पण जेव्हा आपण रुममध्ये नसू तेव्हा ती पेटती राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आपण जर रोज अर्धा तास घरात कँडल्स लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीसे होते.

Vastu tips, Vastu Tips For Candles
घराला डोर बेल लावत असाल तर हे नियम जाणून घ्या,अन्यथा संकटात सापडाल !

२. जर आपल्याला नवीन ट्रेंडनुसार (Trend) जास्त एक्सप्रेसिव्ह आऊटगोइंग किंवा सोशल व्हायचे असेल तर, घराच्या उजव्या बाजूच्या भागात खूप साऱ्या मेणबत्त्या पेटवू शकतो. यामुळे यामुळे उजव्या भागाचे अग्नितत्त्व भक्कम होऊन आपल्यात भावनात्मक बदल येईल.

३. आपल्याला घरात सकारात्मक ऊर्जा आणायची असेल तर घराच्या नैऋत्य भागात दोन कँडल्स आपण पेटवायला हव्या. कँडल्सचे अग्नितत्त्व नैऋत्य भागाला आधार देऊन सकारात्मक ऊर्जा प्रदान करते.

४. जीवसनातील प्रत्येक क्षण हा मोकळेपणाने जगायचा असल्यास घराच्या ईशान्य भागात कँडल्स लावायला हवे. त्यामुळे कँडल्सचे अग्नितत्व ईशान्य भागाला बळकटी देईल. तसेच, आपण आपले तोंड ईशान्येकडे करून कैंडलकडे पाहात ध्यानधारणाही केल्यास आपल्यातील वाईट विचार नष्ट होतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com