Navratri Vastu Tips : नवरात्रीच्या काळात 'या' वास्तू टिप्स लक्षात ठेवा, घरात सदैव टिकून राहिल लक्ष्मीचा वास !

या काळात नऊ दिवस देवीचा घरात वास असतो. तिला प्रसन्न केल्यानंतर घरात संपत्ती व सुख नांदते.
Navratri Vastu Tips
Navratri Vastu TipsSaam Tv

Navratri Vastu Tips : नवरात्रीचा हा उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. या काळात तुम्हाला तुमच्या घरातील वास्तूची विशेष काळजी घ्यावी लागते. यामुळे तुमच्या घरात देवीचा वास सदैव टिकून राहिल, तिची कृपादृष्टी व देवीचा आशीर्वाद मिळेल.

या काळात नऊ दिवस देवीचा घरात वास असतो. तिला प्रसन्न केल्यानंतर घरात संपत्ती व सुख नांदते.

१. हिंदू (Hindu) धर्मात स्वस्तिक चिन्हाचा संबंध कल्याण आणि मंगळाशी आहे आणि त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला हळद आणि चुना लावून स्वस्तिक चिन्ह बनवले जाते. असे केल्याने मंगळ तुमच्या घराकडे आकर्षित होतो आणि सर्व काही शुभ होते.

Navratri Vastu Tips
Shardiya Navratri 2022 : तिचे नऊ दिवस, तिची नऊ रुपं !

२. ईशान्येला देवीजींची स्थापना करावी. जर तुम्ही देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत नसाल, तर या कोनात कलश आणि धान्य यांची प्रतिष्ठापना करावी. असे केल्याने तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदते.

३. जर तुम्ही नवरात्रीत हवन-पूजा करत असाल तर ती अग्नी कोनात करावी कारण ते अग्निस्थान आहे. नवरात्रीच्या सणात अखंड दिवा लावला तर तो या दिशेलाही लावावा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळेल.

४. नवरात्रीच्या संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर ७ कापूर जाळून देवीची आरती करावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते.

Navratri Vastu Tips
Shardiya Navratri 2022: नवरात्रीमध्ये 'या' स्तोत्राचे करा पठण, भीतीपासून मुक्ती मिळेल !

५. नवरात्री दरम्यान, जेव्हा तुम्ही देवी दुर्गाला भोग अर्पण करता तेव्हा तुम्ही त्या वेळी घंटा वाजवावी किंवा टाळी वाजवावी. देवीला आवाहन केल्याशिवाय ती अन्न (Food) घेत नाही.

६. नवरात्रीच्या दिवशी तुळशीच्या रोपामध्ये तुपाचा दिवा लावावा, त्यामुळे घरगुती त्रास दूर होतात आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो.

७. संपूर्ण नवरात्रीमध्ये नियमितपणे कपाळावर लाल चंदनाचा टिळक लावावा, असे केल्याने तुमचे मन शांत राहते, तुमचे मन प्रत्येक कामात व्यस्त राहते आणि जीवनात गतिशीलता येते.

Navratri Vastu Tips
Shardiya Navratri 2022 : शारदीय नवरात्रीत आहे 'या' दिवशी शुभ योग, अशा पध्दतीने पूजा केल्यास होतील लाभ !

८. यासोबतच पूजेच्या खोलीत किंवा घरात बनवलेल्या मंदिरात लाल दिवा लावावा. लाल रंग शुभ मानला जातो. हा रंग सकारात्मकतेचे प्रतीक आहे.

९. नवरात्रीमध्ये देवी दुर्गाला गुलाब, जास्वंद आणि कमळाचे फूल अर्पण करावे. यामुळे देवी प्रसन्न होते आणि संपत्तीचा वर्षाव होतो.

१०. नवरात्रीच्या काळात स्वयंपाकघरात लिंबू कापणे टाळावे. वास्तविक या काळात घरात आंबट वस्तूंचा वापर कमी करा. यामुळे मन अशांत राहते आणि नकारात्मक शक्ती घरात राहतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com