Vastu Tips for Pregnant Women : कशी असायला हवी गर्भवती महिलेची रुम ? या वस्तू रुममध्ये ठेवा

गर्भवती महिलेने कोणत्या वस्तू आपण आपल्या खोलीत ठेवायला हव्या.
Vastu Tips for Pregnant Women, Vastu tips, Vastu shashtra for home
Vastu Tips for Pregnant Women, Vastu tips, Vastu shashtra for homeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आई होणे हे प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास क्षण असतो. या दरम्यान महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य प्रकारे होऊ शकेल.

हे देखील पहा -

वास्तूशास्त्रानुसार आपल्या आजुबाजूला असणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक गोष्टींचा आपल्यावर परिणाम होत असतो. अशा स्थितीत गर्भवती महिलेने अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला ठेवाव्यात, ज्याचा मुलावर सकारात्मक परिणाम होतो. असे केल्याने मूल निरोगी, सुसंस्कृत आणि आनंदी होईल. चला तर मग जाणून घेऊया वास्तूनुसार गर्भवती महिलेची खोली कशी असावी.

१. गर्भवती महिलेने तिच्या खोलीत (Room) हसत असलेल्या बाळाचे चित्र लावायला हवे. ज्यामुळे त्या बाळाचा फोटो पाहून आपल्याला आनंदी राहता येईल.

२. गर्भवती महिलेने आपल्या खोलीत बाल गोपाळांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. तसेच, खोलीच्या अशा जागी ठेवायला हवी ज्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आपले लक्ष तिथे जाईल. असे केल्याने स्त्रीचे मन प्रसन्न राहते आणि त्याचा मुलावरही चांगला परिणाम होतो.

Vastu Tips for Pregnant Women, Vastu tips, Vastu shashtra for home
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार घराचा रचना कशाप्रकारे कराल ?

३. गर्भवती महिला (Womens) तांब्यापासून बनविलेल्या काहीही वस्तू खोलीत ठेवू शकतात. असे मानले जाते की यामुळे खोलीत सकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच गरोदर स्त्री आणि बाळाचे वाईट नजरेपासून रक्षण होते.

४. गर्भवती महिलेच्या खोलीत भगवान श्रीकृष्णाची बासरी आणि शंख देखील ठेवू शकता. असे केल्याने मूल शांत आणि आनंदी होते. तसेच, गर्भवती महिलेला नेहमीच सकारात्मक वाटते आणि जन्माला येणारे मूल देखील निरोगी असते. याशिवाय खोलीत पिवळा तांदूळ ठेवू शकता, असे करणे देखील शुभ असते.

५. गरोदर महिलेच्या खोलीत महाभारत, चाकू-सुरी, निराश करणारी चित्रे कधीही ठेवू नका. गरोदर स्त्रीने सुई-धाग्याचे कामही करू नये, याचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, अशी श्रद्धा आहे.

६. गर्भवती महिलेच्या खोलीत रामायण किंवा श्रीमद् भागवत पुराण देखील ठेवू शकता. तसेच रोज वाचल्याने मुलावर त्याचा शुभ प्रभाव पडतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com