उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी 'वैदिक वैज्ञानिक यज्ञ यात्रा' व 'यज्ञ थेरेपी' मंत्रोच्चार पद्धती

भूषण अहिरे
सोमवार, 7 जून 2021

शिरपूर शहरात मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शिरपूरच्या नागरिकांना उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी वैदिक वैज्ञानिक यज्ञ पद्धतीने "यज्ञ थेरेपी" गायत्री मंत्रोच्चारात व अतिशय धार्मिक वातावरणात संपन्न होऊन संपूर्ण शहरातून यज्ञ यात्रा काढण्यात आली आहे.

धुळे : शिरपूर शहरात मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शिरपूरच्या नागरिकांना उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी वैदिक वैज्ञानिक यज्ञ पद्धतीने "यज्ञ थेरेपी" गायत्री मंत्रोच्चारात व अतिशय धार्मिक वातावरणात संपन्न होऊन संपूर्ण शहरातून यज्ञ यात्रा काढण्यात आली आहे.Vedic Scientific oblation Therapy for Citizens to Get Better Health

शिरपूर तालुक्यातील लोकांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी वैदिक वैज्ञानिक दृष्टिकोनाने पर्यावरण शुद्ध करण्यासाठी "वैदिक वैज्ञानिक यज्ञ यात्रा" करण्यात आली. 

मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची तारांबळ; बच्चे कंपनी मात्र खुश

शिरपूर शहरातील खालचे गाव येथील बालाजी मंदिर येथे यज्ञ सोहळा आटपून त्या नंतर बालाजी रथोत्सव संपूर्ण शिरपूर शहरामधून ही यज्ञ यात्रा काढण्यात आली. 

या यज्ञ यात्रेत २० मोबाईल यज्ञकुंड सोबत होते. २५ स्वयंसेवक ३ किलोमीटर अंतर शास्त्रीय पद्धतीने हवन करत मानव, प्राणी, पक्षी, वनस्पतींसह संपूर्ण पर्यावरणाचे शुद्धीकरण करण्यात आले. म्हणजेच वातावरणातील विषाणू नष्ट करणे तसेच अशुद्ध वातावरण शुद्ध करण्याचा हा शास्त्रीयदृष्ट्या यशस्वी ठरलेला प्रयोग प्रत्यक्षात शिरपूरमध्ये करण्यात आला आहे.

Edited By-Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live