भाज्याचे भाव घटले, भाज्या 50 रू किलो 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

 

 

मुंबई: यंदा प्रचंड पाऊस व पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी पावसाळ्यातील मुख्य पीक वाहून गेले किंवा खराब झाले. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी तेच पीक उशिराने घेतले. पण अनेक भागांत अद्यापही पाऊस असल्याने त्याचा या पिकालाही फटका बसला आहे. याबाबत मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक व्यापारी प्रशांत जगताप यांनी सांगितले की, 'आधीची अतिवृष्टी व आताच्या लांबलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका फळभाज्यांना बसला आहे. महाराष्ट्रातील माल खराब असल्याने अन्य राज्यांतून भाज्या मागविण्याचा विचार झाला. पण मध्य प्रदेशसारख्या अन्य राज्यांतही सध्या पूरस्थिती आहे. याचा भाज्यांची आवक व किमतीवर परिणाम झाला आहे.'
 नवरात्रोत्सव संपला तरी अद्याप पावसाळा संपलेला नाही. याचा भाज्यांवर विपरित परिणाम झाला आहे. आवक रोडवल्यामुळे घाऊक बाजारातच सर्व भाज्या सरासरी ५० रुपये किलोच्या वर गेल्या आहेत. त्यातून माल खराब असल्याने विक्रेते त्रस्त आहेत.
मुंबई व परिसरासाठी या काळात दररोज साधारण चार हजार टन भाज्यांची आवक होत असते. यंदा ती २,८००-३,००० टनांपर्यंत घसरली आहे. यंदा पावसामुळे बराच माल खराब दर्जाचा आहे. एखादा किरकोळ विक्रेता १०० किलो भाजी घाऊक बाजारातून विकत घेत असल्यास त्याला ३० ते ४० किलो भाजी फेकावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे त्याला ६० किलोत १०० किलोचा खर्च भरून काढावा लागत आहे. हेच दरवाढीचे मुख्य कारण ठरत आहे.

भाज्याचे आधीचे आणि आताचे भाव 

घेवडा ६०-८० ८०-१००

भेंडी ८०-१०० १००-१२०

फुलकोबी १२० १२०-१४०

फरसबी ६०-८० ९०-१००

गवार ४०-६० ६०-८०

ढोबळी मिरची ४०-५० ६०-८०

पडवळ ४० ६०

काकडी ४० ६०

टोमॅटो ४०-५० ६०-८०

हिरवी मिरची ४० ६०

तोंडली ६० ८०-१००

 

Web Title vegetable prices soar in maharashtra
 


संबंधित बातम्या

Saam TV Live