सर्वसामान्यांच्या खिशाला चाप! पावसामुळे भाज्यांचे दर आवाक्याबाहेर...

साम टीव्ही
रविवार, 27 सप्टेंबर 2020

घाऊक बाजारात गवार, शेवगा, वांगी, वाटाणा, टोमॅटो, शिराळा, कोबी, भेंडीचे दर किलोमागे 25 ते 30 टक्क्यांनी तर हेच दर किरकोळ बाजारात 40 ते 45 टक्क्यांनी वाढले.

सर्वसामान्यांच्या खिशावर ताण वाढवणारी बातमी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटल्यानं, भाज्यांचे घाऊक दर 25 ते 30 टक्क्यांनी वाढले. त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर झाला असून, छोट्या मोठ्या मंडयांमध्ये सर्वच भाज्यांचे भाव दुप्पट झालेत.

 गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसामुळे भाज्या दुर्मिळ झाल्या. आणि दर हळूहळू वाढण्यास सुरुवात झालीय. घाऊक बाजारात गवार, शेवगा, वांगी, वाटाणा, टोमॅटो, शिराळा, कोबी, भेंडीचे दर किलोमागे 25 ते 30 टक्क्यांनी तर हेच दर किरकोळ बाजारात 40 ते 45 टक्क्यांनी वाढले.

भाज्यांच्या आजचे दर काय आहेत पाहा -


संबंधित बातम्या

Saam TV Live