कोंबड्या घेऊन जाणाऱ्या वाहनाची पुलाला धडक !

जयेश गावंडे
शुक्रवार, 11 जून 2021

अकोल्यातील मन नदीवर असलेला शंभर वर्षापूर्वीच्या जुन्या पुलावरून आज सकाळी कोंबड्या घेऊन जाणारे वाहन पुलावरून जात असताना एका बाजूचा भाग अचानकपणे कोसळला आहे. यामुळे सदरील वाहन पुलावरून जात असताना  पुलाला अर्धे लटकून पडले आहे. 

अकोला :  अकोल्यातील Akola मन नदीवर असलेला शंभर वर्षापूर्वी चा जुन्या पुलावरून आज सकाळी कोंबड्या घेऊन जाणारे वाहन पुलावरून जात असताना एका बाजूचा भाग अचानकपणे कोसळला आहे. यामुळे सदरील वाहन पुलावरून जात असताना  पुलाला अर्धे लटकून पडले आहे. A vehicle carrying chickens collided with a bridge

पूल खचल्याने या राज्यमार्गावरील वाहतून अकोला मार्गे वळविण्यात आली आहे. सदरील पुलाच्या बाजूने नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. कंत्राटदाराने जुना पूल कोरून ठेवल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

अजितदादांनी भल्या सकाळी घेतली पुण्याच्या पोलिस आयुक्तांची शाळा

शेगाव - अकोट राज्यमार्गावरील लोहारा गावाजवळ असलेल्या मन नदीच्या पुलावर इंग्रजकालीन पूल बांधलेला आहे. मात्र याच ठिकाणी कवठा बॅरेज तयार करण्यात आल्याने या नदीपात्रात पाणी जास्त थांबविल्या जाणार असल्याने जुन्या पुलाची उंची वाढविण्यासाठी बाजूनेच नवीन पूल तयार करण्यात येत आहे. 

हे देखील पहा - 

मात्र नवीन पूल तयार करीत असतांना कंत्राटदाराने जुन्यापुलाजवळ खोदकाम केल्याने आज सकाळी या पुलावरून एक वाहन कोंबड्या घेऊन जात असतांना पुलाचा एक भाग पूर्णपणे ढासळला. सदरील वाहन नदीत लटकून पडले आहे.

सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. घटनेनंतर जेसीबीच्या साह्याने कोंबड्याचे हे वाहन काढण्यात आले.  मात्र सदरील पुलाचे एक भाग पूर्णपणे ढासळल्याने या राज्यमार्गावरील वाहतून अकोला मार्गे वळविण्यात आली आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live