करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पहिल्याच दिवशी मावळतीची प्रखर सूर्यकिरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - येथील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याला आजपासून पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी मावळतीची प्रखर सूर्यकिरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोचली.

दरम्यान, रविवार (ता. ३) पर्यंत सलग पाच दिवस सोहळा होणार असून, भाविकांसाठी मंदिर परिसरात एलईडी स्क्रीनची व्यवस्था आहे. 

परंपरेप्रमाणे ९, १०, ११ नोव्हेंबर आणि ३१ जानेवारी, १ व २ फेब्रुवारी या काळात मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सवाचा सोहळा होतो; मात्र गेल्या काही वर्षांपासून किरणोत्सवाच्या तारखा बदलल्या आहेत का, या अनुषंगाने अभ्यास सुरू होता. त्यातील निष्कर्षानंतर नोव्हेंबरच्या किरणोत्सवानंतर येथून पुढे दोन्ही सोहळे पाच दिवसांचे करण्याचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जाहीर केले. त्यानुसार आज पहिल्या दिवशी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. 

सायंकाळी पाच वाजून २३ िमनिटांनी मावळतीच्या सूर्यकिरणांनी महाव्दारापर्यंत प्रवेश केला. त्यानंतर तीन मिनिटांनी ती गरुड मंडपापर्यंत आली. 

सहा वाजून चार मिनिटांनी पितळी उंबरा, सहा वाजून दहा िमनिटांनी चांदीचा उंबरा असा प्रवास करीत सहा वाजून तेरा मिनिटांनी सूर्यकिरणांनी चरणस्पर्श केला. त्यानंतर चार िमनिटे सूर्यकिरणांनी मूर्ती उजळून निघाली. सहा वाजून सतरा िमनिटांनी सूर्यकिरणे मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोचली आणि त्यानंतर मूर्तीच्या डावीकडे ती लुप्त झाली.

Web Title: On the very first day of the Karveer Nivasini Ambabai temple, magnificent Sun-rays to the neck of the statue

संबंधित बातम्या

Saam TV Live