VIDEO | मिरजेत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात 4 दिवसांचं नवजात अर्भक

विजय पाटील साम टीव्ही सांगली 
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

डोक्यात सनकन् तिडीक जावी अशी घटना घडलीय सांगलीच्या मिरजेत. निपाणीकर कॉलनीजवळच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्त्री जातीचं नवजात अर्भक सापडलंय. ऋषिकेश मेहंदकर घरी जाताना त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. जवळ जाऊन पाहिलं तर प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेलं नवजात अर्भक होतं. त्यांनी लगोलग तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

ऋषिकेश मेहंदकर यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि डॉक्टरांच्या सजगतेमुळे बाळाचा जीव वाचला. बाळावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरूयत.

जगात आलेल्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, त्याचं जगणं हिसकावून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही, पण ज्यांनी जन्माला घातलं तेच जर आपल्या पोटच्या गोळ्याचा गळा घोटत असतील तर, याला काय म्हणायचं? किलकिल्या डोळ्यांनी जग पाहायची तिची धडपड आई-बापाला दिसली नसेल का? पोटात असताना तिने हातपाय हलवल्यावर आईला जो आनंद वाटतो तो तिच्या आईला वाटला नसेल का? जन्माला आल्यावर पहिल्यांदा आईकडे बघतानाचं तिचं निरागसपण जाणवलं नसेल का? हे जाणवलं नसेल तर तिच्या आईला माता न तू वैरिणीच म्हणावं लागेल. ही अशी निष्पाप बाळं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकणाऱ्यांनी आई-बाप आणि मुलीच्या नात्याचाच कचरा केलाय. एवढं नक्की.

WebTittle :: VIDEO | 4-day-old infants in heaps of rubbish

संबंधित बातम्या

Saam TV Live