VIDEO | पोटची पोरं, सुनाच करतायत वृद्धांचा छळ

संजय डाफ साम टीव्ही नागपूर
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

रक्ताची  नातीच वृद्ध मंडळींचा छळ करत असल्याचं धक्कादायक वास्तव हेल्पेज इंडिया संस्थेच्या पाहणीतून उघड झालंय. विशेष म्हणजे 72 टक्के वृद्धांना मुलं आणि सुनांकडून त्रास होत असल्याचंही पाहणीतून दिसून आलंय.

काय सांगतोय हेल्पेज इंडियाचा अहवाल?

रक्ताची  नातीच वृद्ध मंडळींचा छळ करत असल्याचं धक्कादायक वास्तव हेल्पेज इंडिया संस्थेच्या पाहणीतून उघड झालंय. विशेष म्हणजे 72 टक्के वृद्धांना मुलं आणि सुनांकडून त्रास होत असल्याचंही पाहणीतून दिसून आलंय.

काय सांगतोय हेल्पेज इंडियाचा अहवाल?

72 टक्के वृद्धांना मुलगा आणि सुनेकडून त्रास होत असल्याचं दिसून आलंय.

मुलगा, सूनेसोबतच भावंडं, पुतणे, भाचे, नातवंडं आणि नोकरांकडूनही वृद्धांचा छळ होतोय.

पाहणीत टोमणे मारणं, शिळे अन्न खायला देणं, टीव्ही पाहू न देणं अशा प्रकारचे छळ होत असल्याचं निष्पन्न झालंय.

29 टक्के लोकांना वृद्धांची काळजी घेण्याचा त्रास वाटतो, तर 30 टक्के लोक वृद्धांना वृद्धाश्रमात ठेवत असल्याचं उघड झालंय.

ज्येष्ठ लोकांना बँक, पोस्ट, बस-ट्रेनमध्ये अपमानास्पद वागणूक मिळतेय

हेल्पेज इंडियाचा हा अहवाल प्रत्येकाला आत्मपरीक्षण करायला लावणाराय. उमेदीच्या काळातला प्रत्येक श्वास ज्यांच्यासाठी घेतला, तेच जर थकलेल्या वृद्धांच्या आयुष्याची संध्याकाळ काळवंडून टाकत असतील, तर ही लाज वाटण्यासारखीच गोष्ट आहे. हे नक्की.

WebTittle ::  VIDEO | Abdominal cramps, torture of the elderly without hearing


संबंधित बातम्या

Saam TV Live