VIDEO | माथेफिरुचा महिला डॉक्टरसह तिघांवर ऍसिड हल्ला

साम टीव्ही न्यूज
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

हिंगणघाटमधली जळीतकांडाची घटना ताजी असतानाच नागपूर जिल्ह्यातल्या सावनेरमध्ये एका महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला झालाय. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या वतीने केल्या जात असलेल्या सर्वेक्षणासाठी या महिला डॉक्टर सहकाऱ्यांसह जात होत्या. त्यावेळी निलेश कन्हेरे या माथेफिरूनं त्यांच्यावर ऍसिड फेकलं. या ऍसिड हल्ल्यात महिला डॉक्टरसह तीन  जण जखमी झाले. जखमींवर नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित महिला डॉक्टर नागपुरातल्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये असिस्टन्ट लेक्चरर आहेत.

या हल्ल्यानंतर नागरिकांनी माथेफिरू निलेश कन्हेरेला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्यानंतर नागरिकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिकांनी केलीय. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. 

WebTittle :: VIDEO | Acid attack on all three with Mathfiru's female doctor

संबंधित बातम्या

Saam TV Live