VIDEO | साम टिव्हीच्या दणक्यानंतर प्रशासन वटणीवर नाशिक मध्ये प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरु...

साम टीव्ही
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

 

  • साम टीव्ही'च्या रिअॅलिटी चेकने प्रशासनाला जाग
  • नाशिक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची आरोग्य तपासणी सुरू
  • साम टीव्ही म्हणजे. बातमी पक्की, इम्पॅक्ट नक्की

आता बातमी साम टीव्हीच्या आणखी एका इम्पॅक्टची. आरोग्य तपासणी केल्याशिवाय परराज्यातून आलेल्या प्रवाशांना स्टेशनबाहेर न सोडण्याचे आदेश आहेत, तरीही नाशिकमध्ये मात्र कोणत्याही प्रकारची तपासणी होत नव्हती. ही गोष्ट साम टीव्हीने उजेडात आणली आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आलीय. पाहूयात

परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची प्राथमिक तपासणी करून, कोरोनाची लक्षणं नसलेल्यांनाच स्टेशनबाहेर सोडण्याचा आदेश असतानाही नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर मात्र कसलीही तपासणी होत नव्हती.  'साम टीव्ही'ने त्याची पडताळणी केली तेव्हा रेल्वे स्टेशनवर काय चित्र होतं.  तुम्हीच पाहा.

ही सगळी परिस्थिती पाहून थेट संबंधित अधिकाऱ्यांना साम टीव्हीने जाब विचारला असता अधिकारी काय बोलले तेही ऐका.

प्रशासन खडबडून जागं झालं.  वैद्यकीय अधिकारी तातडीने स्टेशनवर आले.. आणि येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी सुरू झाली.  साम टीव्हीने नेहमीच सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी लढा दिलाय. चांगलं काम करणाऱ्यांना कौतुकाचे हार घातलेच, पण लोकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करणाऱ्यांवरही वेळोवेळी जोरदार प्रहारही केलेत. नाशिकच्या या प्रकरणातही बातमी पक्की, इम्पॅक्ट नक्की ही बिरुदावली साम टीव्हीने पुन्हा एकदा सिद्ध केलीय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live