VIDEO | जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, या वाक्याने राज यांच्या भाषणाची सुरवात

VIDEO | जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, या वाक्याने राज यांच्या भाषणाची सुरवात

पुणे : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, अशी राज ठाकरे यांनी भाषणाची सुरवात करताच टाळ्यांचा पाऊस पडला. राज यांनी काही क्षण भाषण थांबवावे लागले. दर वेळी आपल्या भाषणाची सुरवात माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो, या वाक्याने करणारे राज यांनी मराठी ऐवजी हिंदू हा शब्द वापरला. 

गोरेगाव येथे पक्षाच्या अधिवेशनाचा समारोप राज यांच्या भाषणाने झाला. अधिवेशनाला मोठी गर्दी होती. पक्षाचा ध्वज बदलून तो या अधिवेशनात भगवा केला. त्याचे कारण सांगताना हा ध्वज माझ्या पक्षस्थापनेच्या वेळी माझ्या मनात होता. सोशल इंजिनिअरिंगसाठी आधीचा झेंडा घेतला होता. पण शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा वापरून तेच केले. माझा डीएनए हा भगवा झेंडाच आहे, असे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांचा राजमुद्रा ही आपली प्रेरणा आहे. 

पक्षाचे अधिवेशन घेणे गरजेचे आहे. सभा, मेळावे होतात तेव्हा एकत्र येतात. पण अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षाचे पदाधिकारी भेटतात, एकमेकांची विचारपूस करतात. त्यासाठी अधिवेशन घेणे गरजेचे वाटले. दिवसभर अनेक लोकांनी, पदाधिकाऱ्यांनी ठराव मांडले. 

सोशल मिडियात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबाबत वाईट मत व्यक्त केलेले खपवून घेणार नाही, अशी तंबी त्यांनी सुरवातीला दिली. फेसबुक, ट्विटर किंवा इतर मिडियातून पक्षाविषयी मते व्यक्त केली तर त्या व्यक्तीला पदावरून दूर करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. पदाचा मान कार्यकर्त्यांना राखावा लागेल, हे त्यांनी आवर्जून सांगितले. पक्षाने केलेले उत्तम काम अवश्य लोकांना कळू द्या, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी पक्षासाठी चांगली साथ दिली, असेही त्यांनी सांगितले.

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात, असे वाक्य त्यांनी या वेळी पुन्हा ऐकविले. थोडे वाईट दिवस आले की सगळे आपल्याला सांगू लागतात. संघटनात्मक बांधणीसाठी पक्षामध्ये एक प्रकारचा सेल तयार करत आहोत. ज्यांना निवडणूक लढवायची नाही आणि संघटनेत काम करायचे असेल त्यांनी आपल्या राजगड या पक्षाच्या कार्यालयात नाव नोंदवावे. सरकार योग्य पद्धतीने काम करणार की नाही, यासाठी शॅडो कॅबिनेट पद्धतीप्रमाणे काम करतील, अशी घोषणा त्यांनी या वेळी केली. 

WebTittle :: VIDEO | All of my Hindu brothers and sisters, Raj, started this speech with this sentence.


 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com