VIDEO | आज बाळासाहेब असायला हवे होते - राज ठाकरे

RAJ THAKAREY WANTED TO BE BALASAHEB TODAY
RAJ THAKAREY WANTED TO BE BALASAHEB TODAY



अयोध्येतील विवादित जागेवर आज सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुनावला. अनेक वर्ष रखडलेल्या केसचा आज निकाल लागलाय. यावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया यायला सुरवात झाली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

" आजचा निकाल ऐकून अतिशय आनंद झाला. इतके वर्ष समजत नव्हतं, जे कारसेवक शहीद झाले त्यांच्या बलिदानाला न्याय मिळणार का? हा प्रश्न होता. आज हा निकाल लागला. मला अतिशय आनंद झालाय , लवकरात लवकर मंदिर उभं राहावं. राम मंदिर उभं  राहील, त्याचबरोबर या देशाची अपेक्षा आहे रामराज्य पण यावं, खऱ्या अर्थाने रामराज्य येण्याची अपेक्षा होती. परंतु बघू पुढे काय होतंय.. या निर्णयातून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे, हा निर्णय ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता. इतकी वर्ष जो संघर्ष झाला त्याचं चीज झालं आणि सुप्रीम कोर्टाला धन्यवाद द्यावे तितके कमी, लवकरात लवकर राम मंदिर व्हावं हीच इच्छा..  " 

- राज ठाकरे 

अयोध्येतील वादग्रस्त जागेत राम मंदिर उभारण्याचा मार्ग आज सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर मोकळा झाला. अलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणात वादग्रस्त 2.77 एकर जागेचे त्रिभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय चुकीचा असल्याचे सांगत, ही सर्व जागा रामलल्ला पक्षकारांकडे देण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रिम कोर्टाने घेतला. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज, अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिला. त्यात सुप्रिम कोर्टाने रामलल्ला या हिंदू पक्षकारांचे दावे मान्य केले. त्यात अयोध्येतील वादग्रस्त जागेत प्रभू रामाचा जन्म झाल्याचा दावा सुप्रिम कोर्टाने मान्य केला आहे. 

Webtitle : raj thackerays reaction after Ayodhya Verdict of supreme court of india

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com