भारतात सट्टेबाजी आता कायदेशीर होणार, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुरांचे संकेत

साम टीव्ही
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020
  • भारतात सट्टेबाजी कायदेशीर होणार ?
  • केंद्र सरकार सट्टेबाजी कायदेशीर करायच्या विचारात
  • केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूरांचे संकेत

आणि आता सट्टेबाजीसंबंधी एक मोठी बातमी.  भारतात सट्टेबाजी कायदेशीर करण्याचा विचार केंद्र सरकार करतंय. खुद्द केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी हे संकेत दिलेत. 

भारतात सट्टेबाजी कायदेशीर करण्याचा विचार केंद्र सरकार करतंय.केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनीच हे संकेत दिलेत. सट्टेबाजी कायदेशीर झाल्यास सरकारला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळेल, या दिशेनं सरकारचं विचारविनिमय सुरु आहे.

सट्टेबाजीला अधिकृत मान्यता दिल्यास गैरप्रकारांना आळा बसेल तसंच अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. सामनानिश्चितीबाबतच्या घटना रोखता येतील, असं मत ठाकूर यांनी व्यक्त केलंय. 

खुद्द केंद्रीय मंत्र्यानंच सट्टेबाजी कायदेशीर करण्यासंबंधी सुतोवाच केलंय. अर्थात सट्टेबाजीच्या आर्थिक कंगोऱ्यांचाच केवळ विचार न होता दुष्परिणामांचा विचार होणं तितकंच आवश्यक आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live