सावधान!  इको फ्रेण्डली फटाकेही ठरतील जीवघेणे, वाचा काय आहे कारण?

साम टीव्ही
सोमवार, 16 नोव्हेंबर 2020
  • सावधान  इको फ्रेण्डली फटाकेही ठरतील जीवघेणे
  • इको फ्रेण्डली फटाकेही करतात प्रदूषण
  • धोकादायक रसायनं पाडतील तुम्हाला आजारी

आता बातमी फटाक्यांबाबतची  यंदा दिवाळीला कोरोनाची काळी किनार आहे  त्यामुळे इको-फ्रेण्डली फटाके वाजवण्याकडे लोकांचा कल आहे  पण हेच इको फ्रेण्डली फटाकेही घातक असल्याचा अहवाल जाहीर झालाय पाहूयात.

फटाके वाजतानाचे व्हिज वापरावेत  दिवाळीमुळे सगळीकडे उत्साहाला उधाण आलंय. अनेकजण फटाकेही वाजवतायत.  पण, यंदाच्या दिवाळीला कोरोनाची काळी किनार आहे. त्यामुळे इकोफ्रेण्डली फटाके घेण्याकडे लोकांचा कल वाढलाय. मात्र, हेच इको फ्रेण्डली फटाकेही प्रदूषण करतात असा दावा आवाज फाऊंडेशनने केलाय.

इको फ्रेण्डली फटाके जीवघेणे?
इको फ्रेण्डली फटाक्यांमध्ये बेरीयम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट, अ‍ॅल्युमिनिअमसारखे पदार्थ असतात. त्याचसोबत त्यात इतरही धातूंची भुकटी असल्याने प्रदूषण पातळी वाढण्याची भीती आवाज फाऊंडेशनने व्यक्त केलीय.
खरंतर दिवाळी हा प्रत्येकासाठी अत्यंत आनंदाचा सण. मात्र यंदाची दिवाळी कोरोनाच्या संकटात साजरी होतेय. त्यामुळे, लस येईपर्यंत काळजी घ्यायला हवी. फटाके जर आरोग्याला घातक असतील, आणि ते कोरोनाला निमंत्रण देणार असतील तर ते टाळायला हवेत. कारण कोरोना अजून गेलेला नाही.

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live