VIDEO | टोलनाक्यावर असाल तर खबरदार! फास्ट टॅग नसल्यास दुप्पट टोल वसुली 

साम टिव्ही
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020
  • टोलनाक्यावर असाल तर खबरदार!
  • फास्ट टॅग लेनमध्ये दुप्पट टोलचा भुर्दंड
  • फास्ट टॅग नसल्यास दुप्पट टोल वसुली 

तुमच्याकडे स्वत:ची चारचाकी असेल आणि त्यावर फास्ट टॅग नसेल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागण्याची शक्यता आहे. कारण 1 जानेवारीपासून सर्वच टोलनाक्यांवर फास्ट टॅगद्वारे टोलवसुली बंधनकारक करण्यात येणारेय.

पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्गावरील टोल नाक्यांवर राखीव असलेल्या दोन ‘फास्ट टॅग लेन’मध्ये घुसखोरी करणं वाहनचालकांना चांगलच महागात पडतंय. कारण फास्ट टॅग नसलेल्या वाहन चालकांकडून १ नोव्हेंबरपासून दुप्पट टोल वसुली सुरू करण्यात आलीय. 

येत्या 1 जानेवारीपासून सर्वच टोलनाक्यांवर ‘फास्ट टॅग’द्वारेच टोल वसुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलाय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार सध्या देशात तब्बल 2 कोटी वाहनांवर फास्ट टॅग आहे. तसंच एकूण टोलवसुलीपैकी 75 टक्के टोलवसुली फास्ट टॅगद्वारे होतेय. हे प्रमाण वाढवण्यासाठी देशभरात गेल्या सहा महिन्यांपासून ‘फास्ट टॅग’ या इलेक्ट्रॉनिक टोल प्रणालीचा वापर वाढवण्यात येतोय. 
मात्र या प्रक्रियेत राज्य सरकारची भूमिका पुरेशी स्पष्ट होण्याची गरज वाहन चालक व्यक्त करतायत. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live