...अंड्याला इंजेक्शन देऊन त्यातून कोंबडीच्या पिल्लाला जन्म देत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतंय...कोंबडीशिवाय अंडं ऊबवून पिल्लू तयार करणं शक्य असल्याचं या व्हिडीओत दाखवण्यात आलंय...पण, ही प्रक्रिया खरंच योग्य आहे का...? अशा प्रकारे पिल्लू तयार करणं शक्य आहे का...? याची आम्ही सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...पण, व्हायरल व्हिडीओ बघा...

या व्हिडीओत बघा...अंड कापण्यात आलं...त्यानंतर त्याला प्लास्टिकचं आवरण घालण्यात आलंय...अंड्याला वारंवार इंजेक्शन देण्यात येतायत. इंजेक्शन देऊन देऊन पिल्लाला तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे...पण, अशा प्रकारे पिल्लाला जन्म देणं शक्य आहे का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटले...त्यांना व्हायरल व्हिडीओ दाखवला आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली...
इंजेक्शन देऊन अंड्यातून पिल्लाला जन्म देणं शक्य नसल्याचं स्पष्ट झालं...पण, ही कोणती प्रक्रिया आहे...? लोकांची दिशाभूल केली जातेय का...? याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली...
अशा पद्धतीने इंजेक्शन देऊन कोंबडीचं पिल्लू जन्माला येऊ शकत नाही
पांढरं अंडं नॉन फर्टाईल असतात, त्यातून कोंबडीच्या पिल्लाचा जन्मच होऊ शकत नाही
फर्टाईल अंडी ही लालसर गुलाबी रंगाची असतात
अंडे उबवणे आणि पिल्लू जन्माला येणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे
अंड्यातून पिल्लू बाहेर यायला 21 दिवसांचा कालावधी लागतो
21 दिवसांच्या कालावधीत त्या अंड्याला ऑक्सिजन, ठराविक तापमान, आर्द्रता आणि ठराविक वेळाने अंडं हलवावे लागते...तसं न झाल्यास ती अंडी उबत नाहीत...अंडं कापण्यात आलं त्यावेळीच त्याची सुरक्षितता संपुष्टात येते...हा व्हिडिओ एडीट करून व्हायरल केलाय...त्यामुळे आमच्या पडताळणीत इंजेक्शनने अंड्यातून पिल्लाला जन्म देणं शक्य असल्याचा दावा असत्य ठरला...
WebTittle :: VIDEO | Born to a chicken puppy by injection?