VIDEO | कोरोनाकाळात उधाऱ्या जोरात! पाहा काय घडलंय?

साम टिव्ही
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

कोरोनाच्या फेऱ्यात, उधाऱ्या जोरात
कडकीच्या काळात मित्र आणि नातेवाईकांचा आधार
खिसा रिकामा. मात्र आप्तेष्टांचा खांद्यावर हात

 

सगळे उद्योग बंद. हाताला काम नाही आणि खिशात दाम नाही. लॉकडाऊनमध्ये असी परिस्थिती प्रत्येकावर आली होती. संसाराचा गाडा कसा हाकायचा? अशा चिंतेने प्रत्येकजण ग्रासला होता. अशा काळात आधार मिळाला तो उधारीचा.

कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे सगळेच उद्योग बंद होते.  बहुतांश लोक घरीच बसून होते. अनेकांच्या नोकऱ्यांवरही कुऱ्हाड आली. हाताला काम नाही आणि खिसा रिकामा.  अशा काळात संसाराचा गाडा चालवायचा कसा. घरातल्या कच्चाबच्चांची पोटं भरायची कशी असे प्रश्न आ वासून उभे होते.  मात्र, नातेवाईक आणि मित्रांनीच खांद्यावर आधाराचा हात ठेवला. आणि कोरोनाच्या चिखलात रुतलेलं संसारचक्र सुरू केलं.

खिशात पैसे नसल्याने प्रत्येकाच्या ताटात हतबलता वाढून ठेवलेली होती.  असेल ते खाऊन अर्धपोटी झोपायचं तर उद्याच्या काळजीची उशी रात्रभर मनाला टोचत राहायची. मात्र, अशा सगळ्या कोरडकाळात मित्र आणि नातेवाईकांनी मदतीची ओल दिली.  मात्र आता लॉकडाऊन संपलंय. जवळजवळ सगळेच उद्योग सुरू झालेयत. त्यामुळे अनेक महिने रिकामे असणाऱ्या हातांमध्ये पैसेही येऊ लागलेत. त्यामुळे कठीण काळात ज्यांनी मदत केली त्यांचे पैसे परत करून उतराई व्हायलाच हवं.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live