VIDEO |  माझा पुतळा जाळा पण देशाची संपत्ती नको - पंतप्रधान मोदी  

VIDEO |  माझा पुतळा जाळा पण देशाची संपत्ती नको - पंतप्रधान मोदी  

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशभरात सुरु असलेल्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडसुख घेतले. हा कायदा संमत झाल्यामुळे काही राजकीय पक्ष वेगवेगळ्या अफवा पसरवत आहेत. ते लोकांना संभ्रमित करत आहेत. भावना भडकावत आहेत. मी या लोकांना सांगू इच्छितो की, मोदीला देशातील जनतेने बसवले आहे. जर तुम्हाला हे पसंत नसेल तर तुम्ही मोदीला शिव्याशाप द्या, विरोध करा, मोदीचा पुतळा जाळा. पण देशाची संपत्ती जाळू नका. गरिबांच्या रिक्षा जाळू नका, गरिबांच्या झोपड्या जाळू नका, अशी विनंती त्यांनी केली. 

आज जे लोक कागद-कागद, प्रमाणपत्र-प्रमाणपत्राच्या नावावर मुसलमानांना भ्रमित करत आहेत. त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की आम्ही गरिबांची भलाई केली, योजनांचे लाभार्थी निवडताना कधीच कागदांच्या अटी ठेवल्या नाहीत. दिल्लीतील रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संबोधित करताना म्हटले की, देशाने निवडलेल्या खासदारांचा सन्मान करा. देशातील दोन्ही सभागृहात नागरिकत्व कायदा संमत झाला आहे. तुमच्याबरोबर मीही दोन्ही सभागृहांना प्रणाम करतो, त्यांचे अभिनंदन करतो.

हे लोक आपल्या स्वार्थासाठी, आपल्या राजकारणासाठी कोणत्या थराला जात आहेत हे आपण पाहत आहोत. जी वक्तव्ये करण्यात आले, खोटे व्हिडिओ, प्रक्षोभित करणारी भाषणे, उच्च स्तरावर बसलेल्या लोकांनी सोशल मीडियावर भ्रम आणि द्वेष पसरवण्याचा गुन्हा केला आहे. संशोधित नागरिकता कायद्यानंतर आता बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तामधील धार्मिक अल्पसंख्यकांना भारताचे नागरिकत्व मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

WebTittle :: VIDEO | Burn my statue but don't want the wealth of the country - PM Modi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com