VIDEO | वजन कमी करण्याच्या गोळ्या घेण्याआधी सावधान!

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

 वजन कमी करण्यासाठी तरूण अभिनेत्रीनं घेतल्या वजन कमी करण्याच्या गोळ्या... आणि अवघ्या 15 तासांतच तिला जगाचा निरोप घ्यावा लागलाय. 22 वर्षीय डान्सर मेघना देवगडकर ठाण्याच्या खोपट भागात राहात होती. नुकतीच ती एका जीममध्ये ट्रेनर म्हणून जॉईन झाली होती. वजन कमी करण्यासाठी तिनं ऑनलाईन गोळ्या मागवल्या, त्या खाल्ल्या आणि ती थेट पोहोचली मृत्यूच्या दारात.

हल्ली वजन वाढल्याच्या तक्रारी अनेकजण करतात, झीरो फिगर किंवा वजन कमी करण्यासाठी काहीही उपाय करू लागलेत. वजन कमी करण्याचं फॅड इतकं वाढलंय की कोणतीही खातरजमा न करता कसल्याही गोळ्या घेतल्या जातायत. तेही डॉक्टरांच्या सल्लाशिवाय... पण हा प्रकार किती जीवघेणा आहे याचा विचार मनालाही शिवत नाही.

वजनवाढीवर नियंत्रण हवं, अवांतर वजन वाढणं आरोग्याला अपायकारकच... पण हे कितीही खरं असलं तरी त्यावरचे उपाय करताना डोळे सताड उघडे ठेवायला हवेत. सजग राहायला हवं. डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली औषधं कायमच उपयोगी ठरू शकतात हे ध्यानात घ्यायला हवंच पण मनमानी औषधं अघोरी ठरू शकतात हेही विसरायला नकोच.

कॅलेंडरच्या आकड्यांना आणि घड्याळाच्या काट्यांना टांगलेलं धावपळीचं आयुष्य आणि त्यातून जंक फूडचा मारा यामुळे वजन वाढीची समस्या हल्ली अनेकांना सतावतेय. वय आणि उंचीच्या प्रमाणात वजन हवं पण ते कमी करण्यासाठी आंधळेपणानं उपाय करणं हे वजन कमी करण्यापेक्षा आपल्यालाच जगातून कायमचं वजा करणारं ठरू शकतं.
 
WebTittle :: VIDEO | Careful before taking weight loss pills!

संबंधित बातम्या

Saam TV Live