VIDEO | कोरोनापुढे चीन हतबल

VIDEO |  कोरोनापुढे चीन हतबल

 कोरोना..एका व्हायरसनं बलाढ्य चीनला अक्षरशः गूढघे टेकायला भाग पाडलंय. चीनमधील बहुतांश रुग्णालय कोरोनाचा संसर्गामुळे खचाखच भरली गेली आहेत. या व्हायरसनं आतापर्यंत 500 हून अधिक जणांचा बळी घेतलाय. तर 25 हजार लोकांना याची लागण झालीय. संसर्ग आटोक्यात येत नसल्यानं चीन सरकार 20 हजार रुग्णांना ठार मारणार असल्याची बातमी समोर येतीय. चीनमधील सर्वोच्च न्यायालय असणारं सुप्रीम पीपल्स कोर्ट हे या सामूहिक हत्येला परवानगी देऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. याबाबतचं वृत्त चीनमधल्या एक वेबसाईटवर प्रसिद्ध झालंय.

 कोरोना संक्रमित रुग्णांसाठी हॉस्पिटल्स अपुरी पडू लागली असून उपचार करणारे डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांनाही या विषाणूंचा संसर्ग होऊ लागलाय. आतापर्यंत वीस डॉक्टर याला बळी पडले आहेत. तर हुबेई प्रांतातील 67 टक्के लोकांना या विषाणूचा संसर्ग झालाय. इथल्या लोकांना आता देवाच्या भरोशावर सोडण्याचा निर्णय चीन सरकारं घेतलाय.
या विषाणूंचा संसर्ग झालेल्या रूग्णांना मारण्यात आलं नाही तर अवघा देशच संपेल अशी भीती सरकारकडून व्यक्त करण्यात आलीय. दरम्यान ही अफवा असल्याचा दावा तिथल्या सरकारकडून करण्यात आलाय. कोरोना हा एक भयानक विषाणू आहे. 


कोरोना व्हायरसची लक्षणं 
डोकेदुखी, नाक गळणे, खोकला, घशाला खवखव, ताप येणे, अस्वस्थ वाटणे, शिंका येणे, थकवा येणे, निमोनिया, फुफ्फुसात सूज, किडन्या निकामी होणे

 दरम्यान कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 1 अब्ज डॉलर्सची गरज असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हंटलंय. यावरून कोरोनाची किती दहशत पसरलीय याची कल्पना येईल. कोरोनावर योग्य उपचार मिळत नसल्यानं चीनमध्ये किड्या मुंग्यासारखी माणसं मरू लागली आहेत. त्यामुळे भारतानं वेळीच सावध व्हायला हवं. कारण कोरोना चीनची वेस कधी ओलांडेल याचा नेम नाही... 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com