VIDEO | चीन बांधणार जगातलं सर्वात मोठं धरण मात्र...

साम टीव्ही
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

चीन बांधणार जगातलं सर्वात मोठं धरण
महाकाय धरण देणार चीनला मरण
भारतात दुष्काळ पाडण्याचे चीनचे मनसुबे उधळणार

आता बातमी चीनच्या नव्या खुमखुमीची. भारताच्या सीमेवर सैन्याच्या मदतीने कुरापती करणाऱ्या चीनने भारताविरोधात नवं षडयंत्र आखलंय. ज्याच्या माध्यमातून चीनने भारताच्या काही भागांत दुष्काळ पाडण्याचं कपट रचलंय.

भारत-चीन सीमेवरील लडाखमध्ये तणावाचं वातावरण असताना आणि भारताने चिनी सैन्याला अनेकदा पिटाळून लावलेलं असतानाही चिनी ड्रॅगनची खुमखुमी काही जाता जाईना. कारण, सीमेवर सैन्याच्या माध्यमातून कुरापती करणारा चीन आता नैसर्गिक स्त्रोतांचं राजकारण करणारेय. त्यासाठी चीन जगातलं सर्वात मोठं धरण बांधण्याच्या तयारीत आहे. 

तिबेटमधून उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्र नदीवर चीन महाकाय धरण बांधणार असून,  जगातील सर्वात मोठे धरण असलेल्या चीनमधील थ्री जॉर्जच्या तुलनेत या धरणातून तीनपट अधिक जलविद्युत निर्मिती होणारय. या धरणाच्या माध्यमातून ईशान्य भारत आणि बांगलादेशात दुष्काळ पाडण्याचा चीनचा कपटी डाव आहे.

भारत आणि चीन दरम्यान पाण्याची आकडेवारी एकमेकांना सांगण्याबाबत करार आहे. मात्र, या कराराचं उल्लंघन करत चीन धरण बांधण्याचं कपट करू पाहतोय. अर्थात, जागतिक देशांच्या संघटना, जागतिक न्यायालयांमध्ये भारत भक्कमपणे बाजू मांडून चीनचा हा डाव नक्की हाणून पाडणार. आणि यातून आधीच जागतिक बहिष्काराच्या गर्तेत अडकलेल्या चीनचे पाय आणखी गाळात जाणार, आणि हेच धरण चीनचं मरण ठरणार. एवढं नक्की.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live