VIDEO | शिवसेना घेणार अजानची स्पर्धा, मुस्लिम मतांवर शिवसेनेचा डोळा?

साम टीव्ही
मंगळवार, 1 डिसेंबर 2020
  • शिवसेना घेणार अजानची स्पर्धा
  • मुस्लिम मतांवर शिवसेनेचा डोळा ?
  • शिवसेनेकडून हिंदुत्वाला तिलांजली; भाजपची टीका
     

दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून अजान स्पर्धेचं आयोजन केल्यामुळे, नवा वाद निर्माण झालाय. भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला घेरायला सुरुवात केलीय. पाहुयात एक रिपोर्ट

ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेकडून अजान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचं आयोजन केलंय. पांडुरंग सकपाळ यांचा अजानबद्दलचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून अजान स्पर्धेचं आयोजन केल्यामुळे, नवा वाद निर्माण झालाय. अजान स्पर्धेचा मुद्दा उचलत भाजपनं शिवसेनेवर जहरी टीका केलीय. 

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या शिवसेनेवर भाजपनं वारंवार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधलाय. आता तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला घेरायची आयती संधीच भाजपला मिळालीय. भाजप या मुद्द्यावरुन शिवसेनेला घेरणार हे निश्चित..

 


संबंधित बातम्या

Saam TV Live