VIDEO | सफाई कामगार बनली परिचारिका !

VIDEO | सफाई कामगार बनली परिचारिका !

अंगावर काटा आणणारं हे दृष्य आहे वाशिमच्या जिल्हा सामान्य रूग्णालयतलं...इथं रूग्णांच्या जिवाशी कसा खेळ खेळला जातोय तुम्हीच पाहा...ही एक सफाई कामगार महिला आहे. जिच्या हातात एरव्ही झाडू असतो पण या व्हिडीओत ही महिला नर्सची भूमिका बजावतीय. 

विशेष म्हणजे या सफाई कामगार महिलेच्या बाजुला एक परिचारिका असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. असं असतानाही एका सफाई कामगार महिलेच्या हाती इंजेक्शन देऊन रूग्णांच्या जिवाशी खेळ केला जातोय. 25 जानेवारीला हा सगळा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतंय. 

 ज्यावेळी ही सफाई कामगार महिल इंजेक्शन देण्यासाठी आली तेव्हा रूग्ण महिलेनं त्याला विरोध केला. 
मात्र हा विरोध झुगारून आपल्याला त्याच महिलेच्या हातून इंजेक्शन देण्यात आलं असा आरोप रूग्ण महिलेनं केलाय. 

हा जीवघेणा प्रकार उघड झाल्यानंतर रूग्णालय प्रशासन खडबडून जागं झालंय. याप्रकरणी कंत्राटी महिला कामगाराला कामावरून काम करण्यात आलंय. तसच प्रसुती वॉर्डात काम करणाऱ्या नर्सची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलंय. 

 आता चौकशीअंती दोषींवर कारवाई होईलही. पण यातून सरकारी रूग्णालयांमधली अनास्था कधी संपणार हा प्रश्न उरतोच. स्वत:ची जबाबदारी झटकून रूग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अधिकारी वर्गावर जोवर दट्ट्या पडत नाही तोवर असे प्रकार सुरूच राहणार. 

WebTittle :: VIDEO | Cleaning workers become Nurs!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com