VIDEO | सफाई कामगारानं केला चिमुकलीचा विनयभंग 

प्रसाद नायगावकर साम टीव्ही यवतमाळ 
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

ही घटना यवतमाळमधली...इथल्या दारव्हा रोडवर असलेल्या एका हॉटेलमध्ये लग्नसमारंभ होता. पै-पाहुण्यांची लगबग सुरू होती. आई वडिलांसोबत एक दहा वर्षांची चिमुकलीसुद्धा लग्नाला आली होती.  हॉटेलमधील सफाई कामगार अक्षय चांदकरची तिच्यावर नजर पडली. त्यानं या चिमुकलीचा पाठलाग सुरू केला. तिला खाऊचं आमिष दाखवलं...

या व्हिडीओत पाहा नराधम अक्षय या मुलीला आपल्यासोबत नेतोय. त्यानं तिच्या खांद्यावर हातही ठेवला. मात्र चिमुकलीनं त्याला विरोध केला. त्यानंतर अक्षयनं तिला जबरदस्तीनं उचलून एकांतात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या चिमुकलीनं कशीबशी आपली सुटका केली आणि तिथून पळ काढला...

हा सगळा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यानंतर पोलिसांनी नराधम अक्षय चांदेकरला अटक केलीय. 

या घटनेनं मुली आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणं आणि आता तर लग्नसमारंभाचं स्थळसुद्धा सुरक्षित राहिलेलं नाही. अत्याचाराचे प्रकार रोखायचे असतील तर अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. 

WebTittle :: VIDEO | Cleaning workers violate Small girl  

संबंधित बातम्या

Saam TV Live