VIDEO | शाळा सुरु करण्याबाबत गोंधळ, 500हून अधिक शिक्षकांना कोरोनाची बाधा

साम टीव्ही 
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020
  • पाचशेहून अधिक शिक्षकांना कोरोनाची बाधा
  • विद्यार्थी-पालकांमध्ये भीती, स्थानिक पातळीवर गोंधळ
  • उद्यापासून शाळा सुरु करण्याबाबत गोंधळ

मुंबई, ठाणे, पुणे वगळता सोमवारपासून राज्यभरात शाळा सुरु होतायंत. मात्र त्यापूर्वीच पाचशेवर शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. पाहुयात एक रिपोर्ट

मुंबई, ठाणे आणि पुणे वगळता सोमवारपासून राज्यभरात शाळा सुरु होतायंत. पण राज्यभरात पाचशेहून अधिक शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आल्यानं खळबळ माजलीय. शाळा सुरु होण्याआधी शिक्षक, कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आलीय. या चाचणीदरम्यानच अनेक शिक्षक कोरोनाबाधित आढळल्यानं विद्यार्थी-पालकांमध्ये भीती निर्माण झालीय.

विदर्भातील 200, मराठवाड्यातील 173, प.महाराष्ट्रातील 132 आणि उत्तर महाराष्ट्रातील 67 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळलेत. 

शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटतायंत. अनेक जिल्ह्यातील शिक्षक कोरोनाबाधित झालेत. असं असताना शाळा सुरु करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live