VIDEO | संघटित गुन्हेगारी टोळीकडून कोरोना लसीला धोका,कोरोना लसीवर इंटरपोलचा मोठा इशारा

साम टीव्ही
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020
  • संघटित गुन्हेगारी टोळीकडून कोरोना लसीला धोका
  • कोरोना लसीवर इंटरपोलचा मोठा इशारा
  • भारतासह 194 देशांना केलं सावध
     

कोरोना लस बाजारात येण्यापूर्वीच त्याच्यावर गुन्हेगारी जगताची वाईट नजर पडलीय. जागतिक सुरक्षा यंत्रणा इंटरपोलनं कोरोना लसीबाबत मोठा इशारा दिलाय. पाहुयात काय म्हटलंय इंटरपोलनं.

कोरोनावर अवघ्या काही दिवसात लस येत असल्यानं मोठा दिलासा मिळालाय पण जागतिक सुरक्षा यंत्रणा इंटरपोलनं कोरोना लसीबाबत मोठा इशारा दिलाय. कोरोना लसीला संघटित गुन्हेगारी क्षेत्राकडून मोठा धोका असल्याचं इंटरपोलनं म्हटलंय. 

संघटित गुन्हेगारी टोळ्या कोरोना लसीला लक्ष्य करु शकतात. अशा टोळ्या कोरोना लसीला प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने धोका पोहोचवू शकतात. हे गुन्हेगार कोरोनाची बनावट लस तयार करून काळ्या बाजारात आणू शकतात किंवा कोरोना लसीचा साठा चोरु शकतात. खोट्या वेबसाईट, रुग्ण बरे झाल्याचे खोटे दावे किंवा अन्य प्रकारे कोरोना लसीला गुन्हेगारी टोळीला धोका आहे, असा इशारा इंटरपोलनं दिलाय.

अमेरिका, युरोप, रशिया, भारतासह अनेक देश कोरोना लसीच्या वितरणावर आणि लसीकरणाच्या योजनेवर काम करत आहेत. त्यामुळे हे गुन्हेगार कोरोना लसीला लक्ष्य करू शकतात. त्यामुळे वितरण आणि लसीकरणाबाबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काळजी बाळगण्याची आवश्यकता आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live