VIDEO | कोरोनाची प्रतिकारशक्ती वाढतेय? वाचा कशी असेल कोरोनाची पुढची परिस्थिती?

साम टीव्ही 
सोमवार, 23 नोव्हेंबर 2020

जगासमोर कोरोनाचं आणखी एक आव्हान
कोरोनाची प्रतिकारशक्ती वाढतेय?
WHO कडून धोक्याचा इशारा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने आरोग्य यंत्रणा चिंतेत असतानाच आता WHO ने आणखी एक धोक्याचा इशारा दिलाय. कोरोना विषाणू अधिक घातक होत असल्याची शंका WHO ने व्यक्त केलीय.

जगातील कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागलाय. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे ही परिस्थिती उद्भवलीय का असा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यास वैद्यकीय क्षेत्राची एक शतकाची मेहनत वाया जाईल, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने दिलाय. 
एखाद्या संक्रमणावरील औषधाची परिणामकारकता कमी होण्याच्या स्थितीला अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. याचा अर्थ विषाणू स्वत:मध्ये बदल करतो. त्यामुळे त्याच्यावर औषध प्रभावी ठरत नाही. विषाणूची प्रतिकारशक्ती वाढल्यानं ही परिस्थिती उद्भवते.

कोरोनावर प्रभावी लस शोधण्यात अद्यापही वैद्यकीय क्षेत्राला यश आलेलं नाही. त्यातच कोरोना विषाणूनं स्वत:मध्ये बदल केल्यास आरोग्य क्षेत्रासाठी हा अतिशय मोठा धोका असेल. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घट सुरू होती. मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागलीय. त्यावर आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजना सुरू आहेतच, मात्रा आपणही योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live