VIDEO | लिफ्टमध्ये अडकुन चिमुकल्याचा मृत्यु, पालकांनो असा निष्काळजीपणा करु नका!

साम टीव्ही
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020
  • लिफ्टमध्ये अडकून चिमुकल्याचा मृत्यू
  • धारावीतल्या घटनेनं सर्वत्र हळहळ
  • लिफ्ट आणि मुलांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर

आपण अनेकदा लिफ्टचा वापर करतो.  लहान मुलंही लिफ्टने ये-जा करतात. पण याच लिफ्टने धारावीत एका लहानग्याचा जीव घेतलाय. त्यामुळे, लिफ्टबाबत सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. पुरेशी काळजी घेतली नाही तर लिफ्ट कशी ठरू शकते जीवघेणी.

लिफ्टच्या दरवाजात अडकलेल्या मुलाची दृश्य लावावीत. तो मुलगा अडकत असताना ब्लर करावं) या पुढची दृश्य बघण्याची हिम्मत कुणाचीच होणार नाहीय.  ही दृश्य विचलित करू शकतात म्हणून आम्ही ती ब्लर केलीयत. घटना घडलीय मुंबईतल्या धारावीत. शाहूनगरमधलील कोझी शेल्टर बिल्डिंग. अवघ्या 5 वर्षांचा मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख आपल्या दोन बहिणींसोबत चौथ्या मजल्यावर घरी जाताना ही घटना घडलीय... दोन्ही बहिणी लिफ्टमधून बाहेर पडल्या. पण, मोहम्मद हुजेईफा लाकडी दरवाजा आणि लोखंडी स्लाईडिंगमध्ये अडकला. लिफ्ट सुरू झाली.  मोहम्मद हुजेईफाचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना प्रत्येकाला चटका लावणारी तर आहेच पण, लिफ्टचा वापर आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आलाय.  त्यामुळे लिफ्ट वापरताना काय काळजी घ्यावी याकडेही लक्ष द्यायला हवं.

लिफ्टमध्ये लहान मुलांना एकट्यांना न सोडता प्रौढ व्यक्तीने असणे गरजेचे आहे. त्याचसोबत, हात, पाय, काठी इत्यादींसारख्या वस्तूंनी लिफ्टचे बंद होणारे दरवाजे थांबवू नका. महत्त्वाचं म्हणजे, लिफ्टच्या दरवाजांपासून दूर उभे राहा. आणि लिफ्ट सुरू झाल्यावर स्लाईडिंगमधून हात बाहेर काढू नका. त्याचबरोबर, लिफ्टमध्ये लहान मुले व पाळीव प्राण्यांना घट्ट धरायला हवं. 

लिफ्टसारखी साधनं ही आपल्या सोयीसाठीच असतात. पण त्याचा वापर करताना पुरेशी काळजी घेतली नाही तर, ती जीवावर बेतू शकतात, त्यामुळे लिफ्टचा वापर करताना काळजी घ्यायलाच हवी, हेच धारावीतील घटनेने संदेश दिलाय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live