VIDEO | मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळालं, तुमच्या ताटातून मासे गायब होणार?

साम टीव्ही
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

तुम्ही जर पक्के मासे खव्वये असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची. तुमच्या ताटातून चविष्ट मासे गायब होण्याची शक्यता आहे. काय आहे त्यामागचं कारण, पाहूयात 

तुम्ही जर पक्के मासे खव्वये असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची. तुमच्या ताटातून चविष्ट मासे गायब होण्याची शक्यता आहे. काय आहे त्यामागचं कारण, पाहूयात 

तोंडाला पाणी सुटतं. असेही काही खव्वये आहेत ज्यांना मासे खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. पण हेच मासे येत्या काही दिवसांत तुमच्या ताटातून गायब होऊ शकतात. याला कारण आहे मत्स्यदुष्काळ. समुद्रात मतलई वारे सुटलेत. त्यामुळे मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळालंय. वाऱ्यामुळे समुद्रात जाळी टाकता येत नाही. जाळी टाकली तरी ती गुरफटून तुटून जाते. त्यातच जी मासळी मिळते तिलाही भाव मिळत नाही. त्यामुळं मासेमारांनी बोटी किनाऱ्यावर नांगरुन ठेवल्यात. मच्छीमार समुद्रात जात नसल्यानं सध्या किरकोळ बाजारात मासळीचे भाव वाढलेत. 

पुढचे काही दिवस अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. अलिबागच्या मच्छीमार जेट्टीवर सध्या नेहमीसारखी वर्दळ पाहायला मिळत नाहीय. सध्या डिझेल आणि बर्फाचाही खर्च निघत नाही. शिवाय खलाशांना पदरचे पैसे द्यावे लागतात. 
परिणामी बोटी किनाऱ्यांवर नांगरून ठेवण्यावाचून पर्याय नाही, असं मच्छिमारांचं म्हणणं आहे. 

अर्थात हा मत्स्यदुष्काळ फार काळ असणार नाही. त्यामुळे खव्वयांनी चिंता करण्याची गरज नाही. वातावरणातील हा बदल तात्पुरत्या स्वरूपातील असून हे संकट टळताच पुन्हा मासेमारीला जोमानं सुरूवात होईल. त्यामुळे तुम्ही जर पक्के खव्वये असाल तर थोडी कळ सोसा...

 


संबंधित बातम्या

Saam TV Live