VIDEO | सर्वसामान्यांसाठी 500 ते 1000 रुपयांत मिळणार कोविशिल्ड लसीचा डोस

साम टीव्ही 
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020
  • 500 ते 1000 रुपयांत मिळणार कोविशिल्ड लसीचा डोस
  • सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावालांची माहिती
  • फेब्रुवारी महिन्यात मिळणार भारतीयांना लस 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मोठी दहशत आहे. दिल्लीत दररोज रूग्णांची संख्या वाढतीय. या पार्श्वभूमीवर सीरम इन्स्टिट्यूटनं एक दिलासादायक बातमी दिलीय. सामान्यांना ही लस केव्हा आणि किती रूपयांत मिळेल.

कोरोनावर लस कधी येणार हा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची मोठी दहशत निर्माण झालीय. दिल्लीत दिवसागणिक रूग्णांची संख्या वाढलीय. तर महाराष्ट्र सरकारनेही दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरू केलीय. अशातच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक दिलासादायक बातमी दिलीय. अत्यंत कमी किंमतीत भारतीयांना कोरोनाची लस लवकरच उपलब्ध होईल असं सुतोवाच अदर पुनावाला यांनी केलंय. हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समीटमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय. 

एप्रिल आणि मे महिन्यात कोणीही विचार केला नव्हता की करोनावरील लस ही इतक्या लवकर बाजारात येईल. आतापर्यंत या लसीनं ज्येष्ठ नागरिकांवरही उत्तम परिणाम दाखवले आहेत.ब्रिटनमध्ये ज्याप्रकारे नियामक मंडळाकडून परवानगी मिळते, तसं आम्ही भारतातही मंजुरी घेणार आहोत. सुरूवातीला आपात्कालिन परिस्थितीत या लसीचा वापर केला जाईल. सामान्य जनतेला ही लस मिळण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो. सरकार मोठ्या प्रमाणात लसीची खरेदी करेल त्यामुळे ही लस कमी किंमतीत उपलब्ध असेल. आम्ही लवकरच दर महिन्याला 10 कोटी डोसचं उत्पादन करणार आहोत. 500 ते 1000 रुपयांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध होणार आहेत. 

फायनल व्हीओ- एकूणच सीरम इन्स्टिट्यूटनं लसीबाबत जय्यत तयारी केलीय. आता लवकरात लवकर ही लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहचावी हीच अपेक्षा.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live