VIDEO | आता करा व्हॅक्सिन पर्यटन!

साम टिव्ही
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

 

  • आता करा व्हॅक्सिन पर्यटन
  •  व्हॅक्सिन पर्यटन म्हणजे काय?
  • कसं असेल व्हॅक्सिन पर्यटन ?

तुम्ही आतापर्यंत शेतीप्रधान, कौटुंबिक, व्यवसायिक, निसर्ग असे पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार ऐकले असतील किंवा अनुभवलेही असतील पण आता व्हॅक्सिन पर्यटनाची नवी संकल्पना समोर आलीय.  पाहुयात कसं असेल हे व्हॅक्सिन पर्यटन ?

कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. आता तुम्हाला व्हॅक्सिन पर्यटन करता येणार आहे..कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील Gem Tours & Travels  या कंपनीनं ही नवी संकल्पना आणलीय. व्हॅक्सिन पर्यटनाअंतर्गत पर्यटकांना अमेरिकेत जाऊन कोरोना लस टोचून घेता येणार आहे

व्हॅक्सिन पर्यटनाअंतर्गत  पर्यटकांना कोरोना लसी सोबतच अमेरिकेत 4 दिवसाचा मुक्काम करता येणार आहे. यासाठी 1 लाख 74 हजार 999 रुपयांचं पॅकेज कंपनीनं जाहीर केलंय. यात विमान प्रवासाचं भाडं, हॉटेलमध्ये तीन रात्र आणि चार दिवसाचा मुक्काम , आणि कोरोना व्हॅक्सिनचा एक डोस यांचा समावेश 

विशेष म्हणजे व्हॅक्सिन पर्यटनासाठी कंपनीनं नोंदणी सुरु केलीय. मात्र व्हॅक्सिन पर्यटनाचं भवितव्य हे पूर्णपणे कोरोना लसीच्या उपलब्धतेवर अवलंबून असणार आहे. शिवाय अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या परवानगीनंतर त्याला अंतिम स्वरुप येईल. त्यामुळे व्हॅक्सिन पर्यटन हे सध्या तरी स्वप्नवत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही  

 


संबंधित बातम्या

Saam TV Live