VIDEO | कोरोना लशीबाबत मॉडर्नाकडून खूशखबर, आपात्कालीन वापरासाठी परवानगी

साम टीव्ही
बुधवार, 2 डिसेंबर 2020

 

  • मॉडर्ना कंपनीनं दिली कोरोना लशीबाबत खूशखबर
  • लस 94 % परिणामकारक असल्याचा कंपनीचा दावा
  • लस गंभीर कोरोनावर 100% प्रभावी ठरल्याचा दावा

अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीच्या लशीची चाचणी 94 टक्के यशस्वी झालीय. विशेष म्हणजे गंभीर कोरोना रुग्णावर ही लस 100% प्रभावी ठरल्याचा दावा करण्यात येतोय.

अजूनही जगावरील कोरोनाचं संकट टळलं नाही. त्यामुळे  जगभरातील कोट्यवधी लोक कोरोना लशीची अतुरतेनं वाट पाहत आहेत. आशातच अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीनं गूड न्यूज दिलीय. आपली लस 94.1% परिणामकारक असल्याचा दावा कंपनीनं केलाय. विशेष म्हणजे गंभीर कोरोनावर ही लस 100 टक्के प्रभावी ठरल्याचाही दावा करण्यात आलाय. लशीच्या क्लिनिकिल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात हे समाधानकारक रिजल्ट आलेत.

मॉडर्नानं तिसऱ्या टप्प्यात 30,000 जणावर लशीची चाचणी केली. त्यामध्ये  196 कोरोना रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 30 रुग्ण गंभीर होते. या गंभीर रुग्णांवर ही लस 100 टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं. तर ही लस 94.1% परिणामकारक असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. 

लशीचे परिणाम समोर आल्यानंतर आता लशीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळावी यासाठी  कंपनीकडून प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे ही लस लवकरच उपलब्ध होणार आहे. लशीसाठी भारतही मॉडर्नाच्या संपर्कात असल्याचं समजतंय. मात्र लशीसाठी देशा-देशांमध्ये सुरु असलेली स्पर्धा पाहता भारताला  किती लशी पोहोचणार आणि कधी हा खरा प्रश्न आहे.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live