VIDEO | कधी पाहिलाय का हिरव्या रंगाचा कुत्रा ?

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही
शनिवार, 25 जानेवारी 2020

कुत्रा अनेक जण पाळतात...कुत्रा हा प्राणी कित्येकांच्या आवडीचा असल्याने जगभरात कुत्रा प्रेमींची काही कमी नाहीये...पण, हिरव्या रंगाचा कधी कुत्रा पाहिलाय का...? हे ऐकूनच तुम्हाला विश्वासच बसणार नाही...या व्हिडीओत पाहा...फक्त एकाच पिल्लाचा रंग हिरवा आहे...पण, हा हिरव्या रंगाचं पिल्लू कुत्रीचच आहे का...? या पिल्लाला रंग तर मारला नाही ना...? असे अनेक प्रश्न उपस्थित केले...
त्यामुळं आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...

घरात कुत्रा पाळायचा म्हणून लाखो रुपये खर्च करून लॅब्राडोर, जर्मन शेफर्ड यासारखे कुत्रे अनेकजण पाळतात...या प्रजातींमध्ये जास्तीत जास्त काळ्या, पांढऱ्या, तपकिरी रंगामध्ये असतात...पण, आम्ही या व्हिडीओची पडताळणी केली असता, हिरव्या रंगाचं कुत्र्याच्या पिल्लू असल्याचं आढळून आलं...
त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

कॅलिफोर्नियामध्ये कुत्र्याचं हिरव्या रंगाचं पिल्लू आहेपिल्लाचं नाव हल्क असं असून, त्याचा रंग हिरवा आहे.शेफर्ड प्रजातीच्या कुत्रीनं पिल्लाला जन्म दिला

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या घरी व्हाइट जर्मन शेफर्ड प्रजातीची जिप्सी नावाची कुत्री आहे...तिने काही दिवसांपूर्वी पिल्लांना जन्म दिला...या सगळ्या पिल्लांमध्ये एका पिल्लाचाच रंग फक्त वेगळा आहे...हे पिल्लू चक्क हिरव्या रंगाचं आहे...दरम्यान, या पिल्लाला पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय...त्यामुळं हिरव्या रंगाचंही कुत्र्याचं पिल्लू असं कुणी सांगितलं तर नवल वाटायला नको...

संबंधित बातम्या

Saam TV Live