VIDEO | गुंडानं मागितली वडापावची खंडणी 

संभाजी थोरात साम टीव्ही कराड  
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

गुंड म्हंटलं की अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. हे गुंड व्यापारी, दुकानादारांना खंडणीसाठी छळत असतात. पण कराडमध्ये एक अजब प्रकार घडलाय. इथल्या एका गुंडांना चक्क 25 वडापावची खंडणी मागितलीय. विकास विठ्ठल जाधव असं या फाळकूट गुंडांचं नाव आहे. त्यानं इथल्या हॉटेल साई गार्डनच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली आणि जीव वाचवायचा असेल तर मला दररोज 25 वडापाव आणि 2 हजार रूपये दे असं सांगितलं. हॉटेलमालकानं याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या चिरकूट दादाला अटक केलीय. 

 सध्या हा चिरकूट दादा संपूर्ण कराडमध्ये चर्चेचा विषय ठरलाय. यानिमित्तानं गुंडमंडळींची खरोखरच उपासमार सुरू झालीय की काय ? असा सवालही उपस्थित होऊ लागलाय. 

WebTittle ::  VIDEO | The hooligan demanded the ransom of Vadapav
 
संबंधित बातम्या

Saam TV Live