VIDEO | कसं आहे किसान क्रेडिट कार्ड?

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

ऐका हो ऐका....
आता शेतकऱ्यांनाही मिळणार क्रेडिट कार्ड
मातीत राबणाऱ्या हातांना आता क्रेडिटचा आधार
क्रेडिट कार्डसोबतच मिळणार विम्याचं कवच

 अस्मानी संकटामुळे कातावलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमीय... अवकाळी, दुष्काळामुळे खचलेल्या शेतकऱ्याला आता क्रेडिट कार्डचा आधार मिळणाराय... या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपुरक व्यवसायांसाठी फक्त चार टक्के व्याजाने कर्ज मिळणारेय... पंतप्रधान किसान योजनेतील सर्व शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डचा लाभ मिळणारेय.

शेतकऱ्यांना शेतीसाठी अल्पमुदतीचं कर्ज मिळणार
शेतीसोबतच पशू-मत्स्यपालनासाठीही कर्ज मिळणार
क्रेडिट कार्डसोबत 2 लाखांचं विमा कवच मिळणार
विम्यासाठी 22 ते 330 रुपयांचा माफक हप्ता भरावा लागणार

महत्त्वाचं म्हणजे या क्रेडिट कार्डसोबत शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचा अपघात आणि जीवन विमाही मिळणारेय. फक्त 12 आणि 330 रुपयांच्या हप्त्यावर शेतकऱ्यांना विम्याचं कवच देण्यात येणारय. क्रेडिट कार्ड आणि विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेकऱ्यांना मिळावा म्हणून केंद्र सरकारने विशेष अभियानही राबवतंय. 10 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबवण्यात येतंय.

अवकाळी, दुष्काळासारख्या संकटांमुळे खचलेला शेतकरी खासगी सावकाराच्या दावणीला बांधला जातोय. त्यातून कर्जबाजारीपणा वाढून हा अन्नदाता आत्महत्येच्या मार्गावर पाय ठेवतोय. पण, ही क्रेडिट कार्डची योजना पारदर्शकपणे शेतकऱ्यांच्या पदरात पडावी आणि या योजनेनं शेतकऱ्याच्या मागे लागलेलं दुष्टचक्र भेदलं जावं इतकीच अपेक्षा.

WebTittle :: VIDEO | How is a Kisan Credit Card?

संबंधित बातम्या

Saam TV Live