VIDEO | बिनामास्क ग्राहकाला साहित्य दिल्यास दुकानाला सील....

साम टीव्ही
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020
  • मास्क नसेल तर किराणा नाही
  • विनामास्क ग्राहकाला साहित्य दिल्यास दुकानाला सील
  • कोरोनाला रोखण्यासाठी आयडियाची कल्पना
     

कोरोनाला रोखायचं असेल तर कडक नियम करावे लागतील. मात्र सध्या लोक सर्रासपणे नियमांचं उल्लंघन करतायेत. यावर औरंगाबाद महापालिकेनं एक अनोखी शक्कल लढवलीय. काय आहे ही युक्ती. चला पाहूयात.

 कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्यानं वाढू लागलीय. लोक मोकाटपणे बाजारात फिरू लागलेत.  विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही वाढू लागलीय. अशा लोकांना अद्दल घडवण्यासाठी औरंगाबाद महापालिकेनं एक चांगलीच युक्ती शोधून काढलीय. औरंगाबाद शहरात मास्क नसेल तर ग्राहकाला किराणा आणि इतर कोणतंही साहित्य देऊ नये अशा सूचना व्यापाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यातूनही एखाद्या व्यापाऱ्यानं ग्राहकाला दुकानातील साहित्य दिलं तर त्या व्यापाऱ्याचं दुकान 15 दिवस सील करण्यात येईल.

 दिवाळीपाठोपाठ आता सर्वत्र लग्नसराई असल्यानं बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागलीय. वारंवार आवाहन करूनही लोक नियमांचं पालन करत नाहीत ही वस्तूस्थिती आहे. 

त्यातच आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती असल्यानं काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या लोकांना दुप्पट दंड करण्याची मागणी जोर धरू लागलीय. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेनं उचललेलं हे पाऊल कौतुकास्पद म्हणावं लागेल.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live