VIDEO | पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताचं जोरदार प्रत्यूत्तर

साम टिव्ही
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सीमेवर सुरूच असून त्या कुरापतींना भारतीय सैन्याने आज जोरदार प्रत्युत्तर दिले.


नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सीमेवर सुरूच असून त्या कुरापतींना भारतीय सैन्याने आज जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात पाक सैन्याचे बंकर्स, इंधन डेपो, लाॅंच पॅड उडविण्यात आले. त्यात सात ते आठ सैनिक ठार झाल्याचे तर वीसहून अधिक जखमी झाल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली. या कारवाईचा व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे.

 

ताबारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन होत आहे. त्यात गुरेझ आणि उरी सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली. त्याला आक्रमक उत्तर भारतीय सैन्याने दिले.  त्यात तीन भारतीय जवान शहीद झाले.

भारतात दिवाळीच्या सणाचा उत्साह असतानाच पाकिस्तानने कुरापत काढल्याचे दिसून येत आहे. भारत-चीन सीमेवर तणाव थोडा कमी होत असतानाच पाकिस्तानी सैन्याच्या आडून अतिरेक्यांचा गेल्या दोन-तीन दिवसांपासून घुसखोरीचा प्रयत्न चालविला होता. तो लष्कराने हाणून पाडला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात चार नागरिकही जखमी झाल्याचे वृत्त आहे.  


संबंधित बातम्या

Saam TV Live