VIDEO | अमेरिकेच्या हवाईतळावर इराणचा मोठा हल्ला

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 8 जानेवारी 2020

बगदाद: अमेरिका विरुद्ध इराण युद्धाचे ढग आणखीच गडद झाले आहेत. इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणने मोठा हल्ला चढवला आहे. किमान १२ क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकेच्या लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागण्यात आली आहेत.

बगदाद: अमेरिका विरुद्ध इराण युद्धाचे ढग आणखीच गडद झाले आहेत. इराकमधील अमेरिकी लष्कराच्या हवाईतळावर इराणने मोठा हल्ला चढवला आहे. किमान १२ क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकेच्या लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागण्यात आली आहेत.

अमेरिकेने बगदाद येथील विमानतळाबाहेर शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्‌स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर इराण विरुद्ध अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणने इराकमधील अमेरिकी दूतावास तसेच हवाईतळाला लक्ष्य केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकेच्या मालकीच्या हवाईतळावर मोठा हल्ला इराणने चढवला आहे.

इराकमधील अमेरिकेच्या हवाईतळावर इराणने मोठा हल्ला चढवला आहे. किमान 12 पेक्षा अधिक  क्षेपणास्त्रे इराकमधील अमेरिकेच्या लष्कराच्या ताब्यातील अल असद हवाईतळावर डागण्यात आली आहेत . या हल्ल्यानंतर अमेरिका विरुद्ध इराण युद्धाचे ढग आणखीच गडद झालेत. अमेरिकेने बगदाद येथील विमानतळाबाहेर शुक्रवारी केला होता या  हवाई हल्ल्यात इराणच्या  फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणने इराकमधील अमेरिकी दूतावास तसेच हवाईतळाला लक्ष्य केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेच्या मालकीच्या हवाईतळावर मोठा हल्ला इराणने चढवलाय.
 

'इराणने पुढील हिंसाचार थांबवावा,' असा इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी दिला आहे. इराण आणि इराकने विवेकाचा मार्ग धरावा, असे आवाहन युरोपीय महासंघाने केले आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा परिणाम जगातील शेअर बाजारांवर झाला आहे. जगभरात तैनात असलेल्या अमेरिकेच्या फौजा दहशतवादी असल्याचा ठराव मंगळवारी इराणच्या संसदेत करण्यात आला. सुलेमानी नेतृत्व करत असलेल्या कुद्‌स फौजांसाठी २४ कोटी ४० लाख डॉलर निधी देण्यासही इराणी संसदेने मान्यता दिली. दरम्यान, जर्मनीने इराकमधील आयएसविरोधी आघाडीत तैनात असलेले आपले काही सैनिक माघारी घेणार असल्याचे मंगळवारी सांगितले. 

WebTittle ::   Iran Attacks Great US Airport


संबंधित बातम्या

Saam TV Live