VIDEO | मटण दरवाढीनंतर स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर

VIDEO | मटण दरवाढीनंतर स्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर

मटण दरवाढीचं आंदोलन पेटल्यानंतर आता स्वच्छ मटणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यानं तपासणी केल्याशिवाय बकरे कापायचे नाहीत असा नियम आहे. मात्र या नियमाची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप मटण दरवाढ कृती समितीनं केलाय. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र न घेता बकरे कापून मटणविक्री होत असल्याचं कृती समितीचं म्हणणं आहे.

महापालिका आणि अन्न औषध प्रशासनाकडे कमी असलेल्या मनुष्यबळाचा फायदा मटण विक्रेते उठवतायेत. मात्र मटण दरवाढ विरोधी कृती समितीच्या इशारयानंतर आता कारवाईचं आश्वासन देण्यात आलंय..त्यानंतरही ही परिस्थीती अशीच राहिली तर कोल्हापुरातल्या खवय्यांची पुन्हा गोची होऊ शकते.

WebTittle ::VIDEO | The issue of cleanlines mutton  

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com