VIDEO | आयटी रिटर्न केल्यास मिळते अपघात नुकसान भरपाई?

VIDEO | आयटी रिटर्न केल्यास मिळते अपघात नुकसान भरपाई?

तुम्ही जर आयटी रिटर्न करत असाल तर अपघात झाल्यास सरकार नुकसान भरपाई देते असा दावा केला जातोय.रक्कम साधी सुधी नव्हे तर पगाराच्या 10 पटीने मिळू शकतं असंही मेसेजमध्ये म्हटलंय.पण, खरंच सरकार मदत करते का? याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा. 
अपघाती मृत्यू ओढवल्यास आणि ती व्यक्ती सलग मागील 3 वर्षांचे आयटी रिटर्न करत असेल तर सरकार भरपाई देते.व्यक्तीच्या 3 वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या 10 पटीने रक्कम कुटुंबाला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.

हा दावा केल्यानं याची पडताळणी सुरू केली.अशी नुकसान भरपाई मिळणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे.पण, खरंच सरकार भरपाई देते का? याबद्दल अधिक माहिती कायदेतज्ज्ञ देऊ शकतात.आमचे प्रतिनिधी कायदेतज्ज्ञांना भेटले आणि हा मेसेज दाखवून त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली...

अपघातात मृत्यू झाल्यास सरकार अशी कोणतीही मदत देत नसल्याचं स्पष्ट झालं...मग अपघात झाल्यास कोण नुकसान भरपाई देतं हेदेखील जाणून घेतलं...


त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...सलग तीन वर्षे आयकर भरणाऱ्या व्यक्तीच्या अपघाती मृत्यूनंतर सरकारकडून मदत देत नाही

मोटार वाहन कायद्यांच्या कलम 166 नुसार कोण आणि कुठं अर्ज करू शकतो याची माहिती दिलीय

अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मोटार वाहन कायद्यानुसार मोटार अपघात न्यायाधिकरण हे नुकसान भरपाई मंजूर करते

नुकसान भरपाई सरकार देत नाही, तर संबंधित विमा कंपनी यांच्याकडून वसूल केली जाते


विमा कंपनी अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळते...पण, सरकार मदत करते हा दावा खरा नाही...त्यामुळं आमच्या पडताळणीत आयटी रिटर्न केल्यासं अपघाती मृत्यूनंतर पैसे मिळतात हा दावा असत्य ठरला...

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com