VIDEO | प्रेमविवाह न करण्याची शपथ देणं योग्य?

संदीप नागरे, साम टीव्ही, अमरावती
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

शपथ घेणाऱ्या या मुली आहेत अमरावतीच्या विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीच्या महिला महाविद्यालयातील... त्यांना दिली गेलीय शपथ... असली-तसली शपथ नव्हे, तर महाविद्यालयाने मुलींना शपथ दिलीय चक्क प्रेमविवाह न करण्याची... बलात्कार, हत्या आणि प्रेमविवाहानंतर विस्कटणारे संसार यावर हा शपथेचा उतारा महाविद्यालयाने शोधलाय...

प्रेम विवाह न करण्याच्या या शपथेला काही जणांचा पाठिंबा आहे, खासदार नवनीत कौर राणा यांनी तर या उपक्रमाचं कौतुक केलंय.
कुणी प्रेमविवाह करावा किंवा करू नये, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, त्यावर अशा शपथा देणं हे घटनाबाह्य असल्याचं काहीजणांना वाटतं.
खरंतर प्रेम वैश्विक असतं, प्रेम केलं जात नाही... ते आपसूक होतं... कुणावर प्रेम करावं किंवा कुणावर जीव जडणं थांबवावं अशा गोळ्या औषधं जगात कुठंच मिळत नाहीत. ती अतोनात आतून आलेली भावना असते. मग, अशा शपथा देऊन मनाला बांध घालता येईल का?

बलात्कार, हत्यांच्या घटना घडतायत, हे खरंही आहे, पण त्या रोखण्यासाठी, कायदा-सुव्यवस्था नावाची यंत्रणा कार्यरत आहेच की... आपल्या लोकशाहीत व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला गेलाय...आणि जिथं लोकशाहीचं बाळकडू शिकवलं जातं त्या महाविद्यालयात लोकशाहीचं मूल्य असणाऱ्या व्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटला जाणं कितपत योग्य आहे? शेवटी हा प्रश्न उरतोच.

संबंधित बातम्या

Saam TV Live