VIDEO | दहशतवाद, आणि हल्ल्यांमध्ये अडकलेलं जम्मू-काश्मिर, शांतता कधी नांदणार?

VIDEO | दहशतवाद, आणि हल्ल्यांमध्ये अडकलेलं जम्मू-काश्मिर, शांतता कधी नांदणार?

जम्मू-काश्मिरमधल्या लोकांनी ना दिवाळी साजरी केलीय ना ईद. इथला प्रत्येक माणूस दहशतीच्या सावटाखाली जगतोय. दहशतवादी कारवाया, 370 कलम, केंद्राने घालून दिलेले नियम,आर्मीने आखून दिलेलं आयुष्य आणि आता कोरोनाचं संकट. या सगळ्या गोष्टींमुळे अवघं जम्मू-काश्मिर अशांत झालंय. पाहूयात.

जम्मू-काश्मीरमधल्या 95 टक्के माणसांचा उदरनिर्वाह तिथल्या पर्यटनावर अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षापासून इकडे एकही पर्यटक फिरकत देखील नाही. त्यामुळे या 95 टक्के लोकांच्या रोजच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अतिशय गंभीर होऊन बसलाय.

३७० कलम लागू झाले आणि संपूर्ण जम्मू कश्मीरमध्ये कर्फ्यू लागू झाला. त्यानंतर कलम ३७० मुळे सतत आंदोलनं होत राहिली. त्याचसोबत सतत होणाऱ्या बर्फाच्या नैसर्गिक माऱ्यामुळे संपूर्ण जम्मू-काश्मीर ठप्प होतं. महत्त्वाचं म्हणजे, सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे जम्मू-कश्मीर सावरता सावरत नाहीय. त्यातच, आला कोरोना, ज्यामुळे आजही जम्मू कश्मीर होरपळून निघत आहे.

अगोदर माणसांच्या द्वेषातून दहशतवादी हल्यांसारखं निर्माण झालेलं संकट. मग अस्मानी संकट, परत जीव घेणारं कोरोनाचं संकट. यामुळे इथे येणारा प्रत्येक माणूस आता पोरका झालाय. ज्यातून अवघं काश्मीर अडचणीत सापडले आहे.

काश्मीरचा सुंदर चेहरा प्रत्येकाला माहीत आहे पण इथल्या गरिबीची झळसुद्धा तितकीच विदारक आहे. काश्मीरमधल्या प्रत्येक नागरिकांच्या मनात चाललेली घुसमट ना  केंद्राला दिसते,  ना राज्याला. यातूनच या लोकांमध्ये एक बंडखोरीची भावना सातत्याने दिसून येते. दिवसभर काबाडकष्ट करून चार पैसे मिळतीलच याची शाश्वती आता जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना उरलेली नाही.

महाराष्ट्र आणि कश्मीरमधले नाते  खूप जवळचे आहे. आज काश्मिरमधलं वातावरण पाहिल्यावर असं वाटतं, इथं लोकशाही नांदते  की, हुकूमशाही. आजच्या घडीला इथल्या माणसांचा ना लष्करावर विश्वास आहे, ना केंद्र सरकारवर किंवा ना राज्य सरकारवर.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com