VIDEO | ऐकावं ते नवलंच! कोरोनामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले

संजय डाफ
मंगळवार, 17 मार्च 2020

कोरोना व्हायरसमुळे घटस्फोटाच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय. हो तुम्ही, बरोबर ऐकलंत. नेमकं काय आहे प्रकरण

कोरोना व्हायरस संसर्गाचे जगभरात अनेक पडसाद उमटतायंत, त्यात आता आणखी एका आश्चर्यचकित करणाऱ्या प्रकाराची भर पडलीय. घरात बंद असल्यामुळे दाम्पत्यांच्या भांडणांमध्ये वाढ झालीय, त्याच वादातून घटस्फोटांच्या अर्जाच्या संख्येतही मोठी वाढ पाहायला मिळालीय. चीनच्या शिचुआन प्रांतात हा धक्कादायक प्रकार आढळून आलाय. 300 हून अधिक दाम्पत्यांनी महिन्याभरात घटस्फोटासाठी अर्ज केलाय.कोरोनामुळे चीनमध्ये बहुतेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम सुरु आहे. त्यामुळं लोकं आपआपल्या घरात अडकून पडलीयेत, त्यामुळे दाम्पत्यांमध्ये खटके उडायचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे प्रकरणं थेट घटस्फोटांपर्यंत जाऊन पोहचलीयेत. कोरोनामुळे दैनंदिन जीवनात अनेक गोष्टींवर प्रभाव पडलाय. पण आता कोरोना घटस्फोटाचंही कारण बनतंय, हे नक्कीच चिंताजनक आहे.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live