VIDEO | आठवडाभरात सर्वांसाठी लोकल खुली ?

साम टीव्ही
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

 

  • आठवडाभरात सर्वांसाठी लोकल खुली ?
  • कोरोना येतोय नियंत्रणात 
  • रेल्वे प्रशासनाच्या हालचालींना वेग

आता मुंबईकर चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची सर्वांना प्रतिक्षा आहे, तो निर्णय घेण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने चालवलीय. येत्या दहा दिवसांत सर्वांसाठी लोकल प्रवास खुला होण्याची शक्यता आहे. 

लोकल अभावी सुरु असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांच्या प्रवास यातना लवकरच संपणार आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत होणारी घट लक्षात घेता, प्रशासनानं मुंबईत लोकल सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्यात. 

दिवाळीनंतर राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र तुर्तास तरी कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने 15 डिसेंबरनंतर सर्वांसाठी लोकल प्रवासाची मुभा देण्याची तयारी रेल्वे प्रशासनानं केलीय. त्यासाठी येत्या 11 आणि 12 डिसेंबरला राज्य सरकार, मुंबई महापालिका, आणि रेल्वे प्रशासनादरम्यान बैठक होणार आहे. या बैठकीत सुरक्षेबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. 

कोरोनाच्या संकटानंतर आता परिस्थिती पुर्वपदावर येतेय. त्यामुळे सर्वांसाठी जरी मुंबई लोकलचा पर्याय उपलब्ध झाला, तरीही रेल्वे प्रवासातून कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची सर्वांनीच दक्षता घेणं गरजेचं आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live