VIDEO | सीएसएमटी स्टेशनचं आता रुपडंच बदलणार , पाहा कसा असेल CSMT स्टेशनचा नवा लूक

साम टीव्ही
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020
 • सीएसएमटी स्टेशनचं आता रुपडंच बदलणार
 • सीएसएमटी स्टेशनला मिळणार 1930 चा लूक !
 • विमानतळाच्या धर्तीवर होणार पुनर्विकास
   

सीएसएमटी स्टेशनचा नवा लूक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 1930 साली सीएसएमटी स्टेशन होतं तसा लूक बदलला जाणाराय. त्यामुळे आता सीएसएमटी स्टेशनचा रेट्रो लूक कसा असेल पाहुयात हा रिपोर्ट.

सीएसएमटी स्टेशनचं आता रुपडंच बदलणाराय. 1930 साली जसं सीएसएमटी स्टेशन होतं तसंच स्टेशन आता सगळ्यांना पाहायला मिळणाराय. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेल्या 132 वर्षांच्या सीएसएमची स्टेशनचं लूक बदलण्यासाठी तब्बल 1 हजार 643 कोटींची योजना आखण्यात आलीय. स्टेशनचा पुनर्विकास विमानतळाप्रमाणे होणार असून, प्रवासी आणि पर्यटकांसाठी गॅलरी, कॅफे टेरिया, पार्किंगसह अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत .या स्टेशनचा नवीन लूक कसा असेल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.

 •  स्टेशनला मिळणार 1930 चा लूक !
 • सीएसएमटी स्टेशनची भव्य वास्तू पाहण्यासाठी हॅरिटेज गॅलरी उभारणार
 • गॅलरीत उभे राहून प्रवासी आणि पर्यटक ऐतिहासिक सीएसएमटी स्टेशनचे सौंदर्य न्याहाळू शकतात
 • मेन लाईनसोबतच मेल-एक्सप्रेसच्या गाड्याही सोडणार
 • प्लॅटफॉर्म क्रमांक 18 मध्ये प्रवेश केल्यानंतर कॅफे टेरिया, प्रवाशांना बसण्याची जागा करणार
 • टॅक्सी स्टँड काढण्यात येणार असून, प्रवासी आणि पर्यटकांसाठी जागा मोकळी करणार 
 • सुविधांसाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क हे प्रवाशांकडून वसूल केले जाणार आहे. या स्टेशनचा नवा लूक लवकरच बनवला जाणाराय. त्यामुळे सगळ्यांना 1930 सालातील सीएसएमटी स्टेशन पाहायला मिळण्याची संधी मिळणाराय. 


संबंधित बातम्या

Saam TV Live