VIDEO | चिनी ड्रॅगनच्या उलट्या बोंबा बघा, म्हणे,कोरोना भारतातुन चीनमध्ये आला?

साम टीव्ही
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020

 

  • चिनी ड्रॅगनच्या उलट्या बोंबा बघा
  • म्हणे, कोरोना भारतातून चीनमध्ये आला
  • जगाला कोरोनाच्या संकटात ढकलून चीनचा कांगावा

आता बातमी चीनच्या उलट्या बोंबांची. कोरोनाचा जन्म चीनच्या वुहानमध्येच झाल्याचं आता लपून राहिलेलं नसताना, चीनने मात्र स्वत:च्या पापांचं खापर भारतावर फोडलंय. भारतामुळेच चीनमध्ये कोरोनाचा पसरल्याचा भंपक कांगावा चीनने केलाय.

संपूर्ण जगात कोरोनाने हाहा:कार माजवलाय. कोरोनाच्या राक्षसाने चीनमध्ये जन्म घेऊन, नंतर जगभरात हातपाय पसरल्याचं आता लपून राहिलेलं नाही. त्यावरून जगभरात चीनविरोधात संतपाची लाट असताना चीनने आता उलट्या बोंबा मारण्यास सुरूवात केलीय.

चीनच्या उलट्या बोंबा बघा  भारतातून आलेल्या माशांच्या कंटेनरमधून चीनमध्ये कोरोना पसरल्याचा कांगावा चीनने केलाय. त्याचसोबत, आपण कोरोनाचा जन्मदाता नसल्याचं सांगत तो मी नव्हेच असा पवित्रा चीनने घेतलाय. अर्थात, चीनचा हा भंपक दावा ब्रिटनच्या ग्लासगो विद्यापीठाने फेटाळलाय.

मुळात, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूचे उगमस्थान शोधण्याबाबत चौकशीचा ठराव मंजूर केलाय. त्यानुसार एक पथक पथक चीनच्या दौऱ्यावर जाणार असल्याने चीनची बोबडी वळलीय. आपण केलेल्या पापांचा घडा उघडा पडू नये म्हणून चीन संपूर्ण जगाची दिशाभूल करतोय. पण, करावे तसे भरावे या उक्तीनुसार जगभरात कोरोना पसरवण्याची किंमत चीनला मोजावीच लागणार. एवढं नक्की.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live