VIDEO| लोकशाहीची थट्टा मांडणाऱ्यांना अद्दल घडवाच!

साम टीव्ही
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

 

  • ऐका हो ऐका. उपसरपंचपद विकणे आहे
  • नांदेडच्या महाटी गावात लोकशाची थट्टा
  • गावाने उपसरपंचपद विकलं साडेदहा लाखांना

आपण अनेकदा मालमत्तेचा लिलाव पाहिलाय. अनेक वस्तूंचाही लिलाव आपण पाहिलाय.  पण नांदेडमधल्या एका गावानं एक असा लिलाव मांडला की, त्यातून आपल्या पवित्र लोकशाहीची थट्टा मांडली गेली. कोणतं आहे हे गाव आणि नेमका काय प्रताप केलाय या गावानं.

बोली लागल्याचा व्हिडीओ वापरावा.  त्यात उपसरपंचपदासाठी बोलीचा उल्लेख नको  हा लिलाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या मालमत्तेचा नाहीय.  किंवा हा लिलाव वाळूउपशाच्या कंत्राटाचाही नाही. तर हा व्हिडीओ आहे चक्क उपसरंपचपदाच्या लिलावाचा. ऐकून धक्का बसला ना.  मग हा व्हिडीओ परत एकदा नीट पाहा आणि ऐका.

मंडळी पटली ना खात्री. लोकशाहीची थट्टा करणारी ही धक्कादायक घटना आहे नांदेड जिल्ह्यातल्या महाटी गावातली. इथं मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या असल्याने विटेच्या मातीचा अवैध व्यवसाय जोरात आहे. त्यातूनच या गावातील अनेकजण गर्भश्रीमंत झालेत. ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होण्याच्या बाता मारत इथं थेट उपसरपंचपद विकलं गेलं. तेही तब्बल साडेदहा लाखांना. या पैशांचा वापर गावाच्या विकासासाठी करण्याची मखलाशीही ग्रामस्थ मोठ्या टेंभ्यात करतायत.

स्वच्छ आणि हागणदारीमुक्त महाटी असे फक्त बोर्ड लावून चालत नाही.  परिसर स्वच्छ सुंदर करायला हवाच पण.  त्याचसोबत लोकशाहीचा कचरा होऊ नये याचीही काळजी घ्यायला हवी.  खरंतर, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला हेवा वाटावा अशी घटना भारताला दिलीय. पण त्याच घटनादत्त लोकशाहीची थट्टा भारतातच करणाऱ्या या कपाळकरंट्यांना धडा शिकवायलाच हवा.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live