व्हिडिओ | मेट्रोच्या कामादरम्यान मस्तानीच्या हत्तींची हाडे सापडली?

साम टीव्ही
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020
  • मेट्रोच्या कामादरम्यान सापडले प्राण्यांचे अवशेष
  • पुण्यातील मंडई परिसरात सापडली महाकाय हाडं
  • मस्तानीच्या हत्तींचे अवशेष असल्याची चर्चा

आता बातमी पुण्यातून. पुणे मेट्रोचं काम सुरू असताना खोदकामावेळी जमिनीखाली अवाढव्य आकाराची हाडं सापडल्याने चर्चांना उधाण आलंय. ही हाडं नेमकी कोणत्या प्राण्यांची आहेत यावरून पुण्यात अनेक प्रकारच्या चर्चा होतायत. पाहूयात.

पुण्यात शिवाजीनगर ते स्वारगेट या महामेट्रोच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम सुरू असताना महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांना मंडई परिसरात अज्ञात प्राण्यांचे जीवाश्म सापडले आहेत. आकाराने प्रचंड मोठे असलेले हे अवशेष दोन हजार वर्षापूर्वीचे असल्याचा अंदाज व्यक्त होतोय.

महामेट्रोचे कर्मचारी खोदकाम असताना आणखी अवाढव्य हाडे सापडली. हाडांचा आकार बघता ती हत्तीची असावीत असा अंदाज आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते 200 वर्षीपूर्वी या मैदानात सर्कस भरत होती, त्यामुळे त्या सर्कशीत खेळ करणाऱ्या प्राण्यांची हाड असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यातली गमतीदार गोष्ट अशी की, पेशवेकाळातील मस्तानीच्या ताफ्यातील हत्तीची हाडं असल्याचीही पुणेरी चर्चा सुरू झालीय.

पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी हाडांची पाहणी केली आहेच. त्यातून ही हाडं नेमकी कशाची आहेत याचीही उकल होईल. पण, त्यामुळे इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा दस्तऐवजही तयार होईल, एवढं मात्र खरं.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live